दमदार कामगिरी..सांगोला पोलीस घेरडी दुरक्षेत्र हद्दीत पेट्रोलींग करताना अवैध वाळू वाहतुकीचा टेम्पो पकडला
आलेगाव गावच्या शिवारातील कोरडा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख रुपये किमतीचे वाहन व ४ हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू असा १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल निशांत सावजी यांनी शरद बाळासो दिवसे रा. दिवसेवस्ती, आलेगाव ता. सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या आदेशानुसार पो. कॉ. निशांत सावजी, पो. ना. विजय थिटे, पो. ना.
निबांळकर, पो. कॉ. वाघमोडे असे घेरडी दुरक्षेत्र हद्दीत पेट्रोलींग करीत असताना आलेगाव गावच्या शिवारातील कोरडा नदीपात्रातून अवैध वाळू भरून दिवसेवस्तीकडे वाहन जात असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, पोलीस माहितीच्या ठिकाणी जात असताना आलेगाव ते जवळा रोडवरून एक चारचाकी टमटम येत असलेला दिसला. पोलिसांनी टमटम चालकास इशारा करून टमटम थांबवून पाहणी केली असता टमटमच्या हौद्यात वाळू असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी टमटम चालक शरद बाळासो दिवस रा.दिवसेवस्ती, आलेगाव ता. सांगोला यास ताब्यात घेऊन१ लाख रुपये किमतीचे वाहन व ४ हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू असा १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल निशांत सावजी यांनी शरद बाळासो दिवसे रा. दिवसेवस्ती, आलेगाव ता. सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



0 Comments