Breaking News

क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होममिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमास महिलांचा भरघोस प्रतिसाद होम मिनीस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमात रत्री शक्तीचा जागर हजारो च्या संख्येने महिलांची उपस्थिती

सांगोला शहरात क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होममिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमास महिलांचा भरघोस प्रतिसाद

होम मिनीस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमात रत्री शक्तीचा जागर हजारो च्या संख्येने महिलांची उपस्थिती

न्यू इंग्लिश स्कूल पटांगण अनमोल आईस्क्रीम पार्लर समोर बाद सांगोला येथे रंगलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमास स्त्रीशक्तीचा जागर करून महिलांच्या कलागुणांचा खेळ रंगला. सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांच्या होम मिनिस्टर खेळ पैठणीय कार्यक्रम महिलांचा उत्स्फूर्त आणी उदंड प्रतिसाद मिळाला.

महिलांच्या कलागुणांना वावदेण्यासाठी व त्यांच्यामधील कौशल्याला आणि कल्पकतेला प्रोत्साहन मिळावे म्हणुन गुरुवार दिनांक १६ मे रोजी 

स्व. मा. आम भाई गणपतरावजी देशमुख विचारमंथ आयोजित क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात महिलांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून भाऊजींच्या कल्पकतेला प्रचंड दाद दिली. भरगच महिलांची गर्दी, डेकोरेशन व साऊंड आणी योग्य नियोजन

 बघून वयोवृद्धमहिलांसह युवा तरुणीने देखील या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या कला सादर केल्या. रंगलेला हा खेळ पैठणीचा कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी विविध मनोरंजक कौशल्यपूर्ण खेळाचा आनंद लुटला.

या कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिताताई देशमुख, माजी नगराध्यक्ष राणीताई माने, माजी सभापती राणीताई कोळवले, माजी उपनगराध्यक्षा स्वातीताई मगर,

 नीताताई ढोबळे, महिला सूतगिरणीच्या चेअरमन विमलताई कुमठेकर, सूतगिरणीच्या संचालिका शारदाताई मस्के, हॅपी पार्क संचालिका वृषलाताई गवळी, डॉ. उषा देशमुख यांच्यासह विविध पदावर कार्यरत असणाऱ्या महिला व मुली मोठया संख्येने उपस्थित होत्या.

भाऊजी क्रांतीनाना बेळगावकर यांनी आपल्या आवाजाने व कल्पकतेने सर्वांनाप्रत्येक महिलांमध्ये विविध सुप्त कलागुण आसतात. परंतु संसाराच्या जबाबदान्या पेलावत असताना महिलांमधील कलागुणांना वाव मिळत  नाही. 

या कलागुणांना वाव देण्यासाठी  स्व. भाई गणपतरावजी देशमुख विचारमंच यांच्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यानिमित्ताने महिलांना व्यासपीठ मिळाले तसेच महिला संघटन आणि महिलांमधील  कलागुणांच्या विकासाची दिशा मिळाली.

डॉ. निकीताताई देशमुख (वैद्यकिय अधिकारी सांगोला)

खेळवून ठेवले महिला, युवती, वयस्कर महिलांसह चिमुकल्या मुलींनी सुद्धा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी सांगोला शहर आणि उपनगरातीलच नव्हे तर संबंध तालुक्यातीला महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Post a Comment

0 Comments