google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना ..पंढरपूर तालुक्यात "या" डॉक्टरला साडे पाच वर्षांचा कारावास !

Breaking News

धक्कादायक घटना ..पंढरपूर तालुक्यात "या" डॉक्टरला साडे पाच वर्षांचा कारावास !

 धक्कादायक घटना ..पंढरपूर तालुक्यात "या" डॉक्टरला साडे पाच वर्षांचा कारावास !

 पंढरपूर :- वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला न्यायालयाने दंडासह साडे पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून या शिक्षेमुळे बोगस डॉक्टरांना आळा बसण्याची शक्यता आहे.

बोगस डॉक्टरांचा सगळीकडेच सुळसुळाट असून वैद्यकीय क्षेत्रातील कसलीही पदवी नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळून पैसे गोळा करण्याचा उद्द्योग हे भामटे करीत असतात. विशेषतः 

मोठ्या शहरात आणि ग्रामीण भागात असे प्रकार अधिक प्रमाणात चालतात. काही भामट्या डॉक्टरानी तर शहरात मोठमोठी रुग्णालये सुरु केली असल्याच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातही अधूनमधून अशा बोगस डॉक्टरबाबत चर्चा होत असते. जनतेच्या आरोग्याचा आणि जीवनाचा प्रश्न असल्याने बोगस डॉक्टर ही एक मोठी समस्या निर्माण होताना दिसत आहे.

 पंढरपूर तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला मात्र आता चांगलेच इंजेक्शन बसले असून कारावासाची शिक्षा या बोगस डॉक्टरला करण्यात आली आहे. कसलीही पदवी नसताना पंढरपूर तालुकयातील तुंगत येथे पश्चिम बंगाल येथील विबास उर्फ विभास वीरेन रॉय हा रुग्णावर उपचार करीत होता. 

पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे बस स्थानकाच्या परिसरात याने आपला दवाखाना थाटला होता आणि कसलीही वैद्यकीय पदवी नसताना तो रुग्णांच्या जीवाशी खेळत होता. डॉकटर समजून गरजू रुग्ण त्याच्याकडे उपचारासाठी जात होते आणि तो देखील रुग्नांवर उपचार करीत होता.

 वैद्यकीय व्यवसाय याचे कायदेशीर ज्ञान नसताना, मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयाची पदवी नसताना आणि  इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट १९५६ अंतर्गत नोंदणी नसताना किंवा महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अक्ट १९६१ नोंदणी प्रमाणपत्र नसताना त्याचा हा उद्द्योग सुरु होता.  

डॉक्टर असल्याचे भासवत तो रुग्णावर उपचार करीत होता आणि खोटेपणाने रुग्णाच्या जीवाशी खेळून पैसे मिळवत होता. ही बाब तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या बोगस डॉक्टरच्या विरोधात फिर्याद दिली पण त्यापूर्वी हा भामटा तब्बल सात वर्षे त्या ठिकाणी रुग्णावर उपचार करीत होता.

सदर प्रकरणाची सुनावणी पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झाली आणि सरकारी वकिलाचा युक्तिवाद तसेच समोर आलेले पुरावे विचारात घेत न्यायालयाने या बोगस डॉक्टरला दोषी ठरवले. भारतीय दंड विधान कलम ४१९, अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व तीन हजार दंड तसेच भादंवि कलम ४२० मध्ये दोन वर्षे सश्रम कारावास तसेच इंडियन मेडिकल

 कौन्सिल अॅक्ट १९५६ चे कलम १५ (२) अन्वये सहा महिने साधी कैद व दंड एक हजार व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट १९६१चे कलम ३३ (२) अन्वये दोन वर्षे सश्रम कारावास व दंड पाच हजार अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले.

Post a Comment

0 Comments