google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करू द्या नाहीतर जीवे मारू; विद्यार्थ्यांची शिक्षकांना धमकी

Breaking News

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करू द्या नाहीतर जीवे मारू; विद्यार्थ्यांची शिक्षकांना धमकी

 दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करू द्या नाहीतर जीवे मारू; विद्यार्थ्यांची शिक्षकांना धमकी

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी करू द्या नाहीतर जीवे मारू अशा स्वरुपाची धमकी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.घटना महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील सेवली येथील परीक्षा केंद्रावर घडली आहे. 

आधी सेवली येथील परीक्षा केंद्र उघडपणे मोठ्या प्रमाणावर कॉपी करण्यासाठी बदनाम झाले होते. पण महाराष्ट्र शासनाने यंदा कॉपीमुक्त मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परीक्षा केंद्रावर कॉपी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

 यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड चिडले आहेत. चिडलेल्या विध्यार्थी व पालकांनी बुधवार 8 मार्च 2023 रोजी नेहमी प्रमाणे कॉपी पुरविण्याचा प्रयत्न केला. परंतु केंद्रावरील पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला.

यावरून विद्यार्थी व पालक यांनी परीक्षेचे काम करणाऱ्यांना शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना धमक्या देणे सुरू केले. या प्रकरणी सेवली येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. 

तसेच याबाबत एक तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे करून केंद्रावर वाढीव पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. परीक्षा केंद्र प्रमुखांनी शिक्षण अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केंद्रावर बंदोबस्त वाढवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments