Breaking News

शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी सोलापूर जिल्ह्यात 'या' तारखेला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन

 शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी सोलापूर जिल्ह्यात 'या' तारखेला

मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन 

सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित हवामान अंदाजानुसार दि.१५ ते १८ मार्च २०२३ दरम्यान,तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस व तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळ वारा (वेग ४० ते ५० किमी प्रति तास) होण्याची शक्यता 

मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे.सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने केळी बागेतील वजनाने मोठ्या असलेल्या घडांची झाडे पडु शकतात.

परिपक्व झालेली टरबूज आणि खरबुजाची फळे तोडून घेवून सावलीत ठेवावी व फळे बाजारपेठेत नेण्याची व्यवस्था करावी.परिपक्व झालेले कांदा पीक काढून घ्यावे. स्थानिक वातावरणाचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवांनी शेतातील माल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा.

हंगामी पिके, फळबागा, भाजीपाला पिकामध्ये अंतरमशागतीची कामे निंदण (खुरपणी) इत्यादी, तसेच कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनाची फवारणी व उभ्या पिकात खते देण्याची कामे पावसाच्या उघडीपनंतर करावीत, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. सूरज मिसाळ यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी

सोलापूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने परिपक्व अवस्थेतील रब्बी पिकांची काढणी व मळणी करावी.

काढणी केलेल्या शेत मालाची मळणी करणे शक्य नसल्यास पीक सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ताडपत्रीचा साहाय्याने झाकून ठेवावे. पक्कभाजीपाला व फळपिकाची काढणी लवकर करून घ्यावी. – डॉ. तानाजी वळकुंदे, प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ

Post a Comment

0 Comments