google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक... रस्त्यावर ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; ७ किलोमीटर पाठलाग करून टोळक्याने तरुणाला संपवलं

Breaking News

खळबळजनक... रस्त्यावर ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; ७ किलोमीटर पाठलाग करून टोळक्याने तरुणाला संपवलं

 खळबळजनक... रस्त्यावर ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; ७ किलोमीटर पाठलाग करून टोळक्याने तरुणाला संपवलं

एकीकडे संपूर्ण राज्यभरात होळीचा सण साजरा केला जात असताना दुसरीकडे खुनाच्या घटनेने नाशिक हादरलं आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात एका तरुणाची भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिकमधील शनी मंदिर परिसरातील रहिवासी असलेला किरण गुंजाळ (२७) याची दिंडोरी नाक्यावर असलेल्या स्वीटच्या दुकानासमोर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. 

काही अज्ञातांनी आधी किरण याचा ५ ते ७ किलोमीटर पाठलाग केला. नंतर तो हाती लागताच त्याच्यावर तीन ते चार जणांच्या टोळीने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मयत किरण गुंजाळ हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे. किरणच्या लहान भावाचा देखील २०१८ साली खून झाल्याची माहिती मिळाली आहे.

 किरण हा दिंडोरी रोडवरच असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरची विक्रीचा व्यवसाय करत होता. तो पेठ रोड भागातील शनी मंदिर परिसरातील रहिवासी होता. पूर्ववैमान्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

खुनाची घटना घडल्यानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. संशयित हल्लेखोर हल्ला केल्यानंतर फरार झाले असून परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments