बारावीची परीक्षा सुरू असतानाच मोठा घात झाला आणि
...डॉक्टर होण्याचे तेजस्विनीचे स्वप्न अधुरेच राहिले.
सोलापूरसह अन्य भागात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. मात्र या परीक्षेत दरम्यानच एक दुर्दैवी घटना घडली आहे. पेपर लिहीत असतानाच एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तेजस्विनी मनोज दिघे असे या विद्यार्थिनींचे नाव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील तेजस्विनी ही बाभळेश्वर येथील कॉलेजमध्ये शिकत होती. प्रवरानगर येथील केंद्रावर बारावीच्या परीक्षा सुरू होत्या.
तेजस्विनीने इंग्रजी व भौतिकशास्त्राचा पेपर सोडवला होता. रसायनशास्त्राच्या पेपरच्या दिवशी तिने रात्रीचे राहिलेले इडली सांबर खाल्ले होते. मात्र पेपरच्या दिवशी तिला त्रास सुरू झाला. पोटाचा त्रास सुरू झाल्यावर तिला लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानंतर तिला संगमनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिचा त्रास वाढतच गेला. यानंतर तिला पुण्यातील केम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र शेवटी फूड पॉइजनमुळे तेजस्विनीचा मृत्यू झाला. तेजस्विनी ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. डॉक्टर होण्याचे तेजस्विनीचे स्वप्न अधुरेच राहिले.
0 Comments