सांगोला अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या ५ हजार ९२३ खातेदारांच्या दुरुस्ती याद्या पुन्हा
वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्या : तहसीलदार अभिजीत पाटील
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सांगोला :- ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगोला शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
यामध्ये सांगोला तालुक्यातील संगेवाडी. सोनंद, कोळा व हातीद या ४ मंडल मधील ३९ गावातील ५ हजार ९२३खातेदारांची दुरुस्ती यादी वरिष्ठांकडे पुन्हा पाठवण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार अभिजित पाटील यांनी दिली आहे.अतिवृष्टीमुळे शेतातील पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
चौकट:-
हवामानातील बदल आणि इतर तालुका आणि जिल्ह्यांमध्ये झालेली गारपीट आणि त्यांचे होत असलेले पंचनामे पाहून सांगोल्यात ऑक्टोंबर २०२२ मध्ये झालेली अतिवृष्टी आणि येथील नुकसानीचे झालेले पंचनामे याच काय झालं, अजून याद्या दुरुस्तीवरच आहेत परंतु मोबदला मिळाला नाही. अनुदान मिळणार आहे की नाही? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
चौकट:-
मागील सहा महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, सदर नुकसानीचे अनुदान रखडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना दैनिक सांगोला वृत्तवेध या वर्तमानपत्रातून वेळोवेळी पाठपुरावा करत प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी आवाज उठला. दरम्यान वरिष्ठ कार्यालयाकडून याद्यांमध्ये दुरुस्ती आल्यानंतर महसूल प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात पुन्हा बातम्या प्रसिद्ध केल्या. दिलेल्या बातमीनुसार अवघ्या दोन ते तीन दिवसात याद्यांमधील त्रुटी दूर करून पुन्हा दुरुस्ती याद्या वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याने दैनिक सांगोला वृत्तपत्र या वर्तमानपत्राचे शेतकरी वर्गातून आभार व्यक्त केले जात आहे.
हातात तोंडाला आली पिकेपावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे उध्वस्त झाली होती. दरम्यान सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची ग्रामसेवक,तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले होते.
यामध्ये सांगोला तालुक्यातील ३९ गावतील एकूण ५ हजार ९२३ लाभार्थ्याच्या जिरायत व बागायत मधील नुकसान पोटी महसूल प्रशासनाकडून गाव कामगार तलाठी, कृषी सहाय्यक वग्रामसेवक यांच्याकडून पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.
या अनुदान यादी मधील शेतकऱ्यांच्या आधार कार्ड अथवा बँक पासबुक क्रमांक यामध्ये बदल असल्याने शेतकऱ्यांच्या याद्या पुन्हा दुरुस्तीसाठी महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.सदर प्राप्त याद्या मधील दुरुस्ती करून पुन्हा याद्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत.
नुकसानीपोटी ७ कोटी ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. सांगोला शहर व तालुक्यातील संगेवाडी, सोनंद, कोळा, हातीद या चार मंडल मधील ३९ गावातील
५ हजार ९२३ नुकसानग्रस्त शेतक-यांची यादी वरिष्ठ -अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली असून, अनुदान प्राप्त झाल्यास -शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली आहे.


0 Comments