पंढरपूर चेअरमन अभिजित पाटील यांची वचनपूर्ती ! श्री विठ्ठल चे ७ लाख २५ हजार टन गाळप पूर्ण...
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्याप्रमाणे ऊस दर देण्यासाठी प्रयत्न करणार-सचिन पाटील
पंढरपूर प्रतिनिधी,श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ७ लाख २५ हजार टन गाळप पूर्ण झाला. यंदाच्या हंगामाच्या गाळपाचा सांगता समारोह संपन्न झाला.
जनतेला दिलेला यशस्वी गाळप करण्याचा व शेतकरी बांधवांच्या शेवटच्या उसाच्या कांडीचे गाळप पूर्ण करण्याचा शब्द या निमित्ताने पूर्ण झाला आहे. नव्या संचालक मंडळाच्या नेतृत्वातील पहिल्याच वर्षी मोठी झेप घेतली आहे. आपल्याला इथेच थांबायचे नसून आगामी वर्षात अजून मोठी झेप घ्यायची आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातुन ऊस पळवणारांणी एक प्रकारे कारखाना बंद पडायला खत पाणीच घातले होते त्यांनाही आपण पहिल्याच वर्षी दाखवून दिले की विठ्ठल कारखाना ही तुमच्या कारखान्याच्या बंधावरचा ऊस तोडून अनु शकतो त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनाही टणाला 200-250 रूपये जादा मिळाले
या वर्षी संपुर्ण जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांच्या दरात ऊस मागात फिरत होते कारण शेतकऱ्यांचा राजवाडा विठ्ठल पुन्हा सूरू झाला
पुढील काळात ही विठ्ठल कारखान्यामुळे दाराची स्पर्धा चालु राहणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य दाम मिळणार आहे.आपला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांच्या च्या धर्तीवर चालवून शेतकऱ्यांना 3000 पर्यंतचा दर देण्यासाठी प्रयत्नशील राहूया…
– मा श्री सचिन पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना पंढरपूर तालुका अध्यक्ष


0 Comments