ग्रामपंचायत वाटद मिरवणे ता जि रत्नागिरी ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्र व्हीपीएम २०१६/प्र. क्र २५३परा३ हया परिपत्रकाप्रमाणे संबधित अधिकाऱ्यानवर कारवाई करावी
आमरण उपोषण उपोषणकर्ता माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन चे मुख्य प्रचार प्रमुख व पत्रकार श्री निलेश रहाटे
आज आमरण उपोषण चा चौथा दिवस असून ही अध्याप ही शासना नी काहीही निर्णय घेतलेला नाही. उपोषणकर्ता माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन चे मुख्य प्रचार प्रमुख व पत्रकार श्री निलेश रहाटे यांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पासून थकवा जाणवत असून प्रकृती खालावत आहे
असे वाटते उपोषणा च्या पहिल्या च दिवशी मा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबाना आझाद मैदान वरती त्यानी स्वतः झालेल्या भ्रष्टाचार चे पुरावे हातात देऊन सुद्धा त्यावर विचार केला जात नसेल तर आमरण उपोषणा मध्ये मरण आले तरी चालेल.
ग्रामपंचायत वाटद मिरवणे ता जि रत्नागिरी मध्ये स्वछ भारत मिशन ग्रामीण योजने चा मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झालेला पुराव्या सहीत दाखवून ही संबधित अधिकारी गप्प बसून आहेत मनजे देशाचा मालक मेला तरी चालेल पण नोकर वाचला पाहिजे
अशी अवस्था झालीली आहे. ग्रामपंचायत मध्ये झालेल्या सौचालय वाटप मध्ये सरपंच, सदस्य,ग्रामसेवक हयाच्या ही नावावर सौचालय चा लाभ घेतलेला दिसून येतोय सरपंच पद किंवा सदस्य पद भरताना ही त्याना सौचालय दाखला देणे बंधनकारक असते मग येवडा कामामध्ये हलगर्जी
पणा का ते सर्व सिद्ध करून ही जर देशाच्या मालका ला न्याय मिलत नसेल तर मालकानी कोणावर विश्वास ठेवायचा.जो पर्यत ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्र व्हीपीएम २०१६/प्र. क्र २५३परा३ हया परिपत्रकाप्रमाणे संबधित अधिकाऱ्यानवर कारवाई होत नाही तो पर्यत आमरण उपोषण हे चालूच राहणार.


0 Comments