इयत्ता 12 वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही
राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण पेपरफुटी प्रकरणी 4 परीक्षा केंद्रांचे संचालक बदलले
3 मार्च रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाले होते
तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये काल सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत होता. हा गणिताचा पेपर कुणी फोडला? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे?
याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, पेपरफुटीकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. गणित विषयाच्या पेपरफुटीप्रकरणी कारवाई करताना अज्ञातांवर गुन्हा दाखल करुन कारवाईला वेग आलाय. या प्रकरणी बुलढाण्यातील 4 परीक्षा केंद्रांचे संचालक बदलण्यात आलेत.


0 Comments