आदर्श शिक्षक पुरस्कार सुशिलकुमार गायकवाड यांना प्रदान
अल अजीज एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी तर्फे शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.राधेश्याम गुप्ता यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य श्री. नामदेवराव चापे, साहित्यिक प्राध्यापक श्री. शिवाजी वाठोरे, श्री. टी. एन. पाटील,
प्रमोद शर्मा,अल अजीज एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अध्यक्ष श्री.मोहम्मद सुमान कुरेशी, सचिव श्री. मोहम्मद अबू बकर कुरेशी,सुनिल वाकेकर, अर्चना अहिरे,यांची उपस्थिती होती.यावेळी माजी प्राचार्य श्री. नामदेवराव चापे, साहित्यिक प्राध्यापक श्री. शिवाजी वाठोरे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी माजी प्राचार्य श्री. नामदेवराव चापे यांनी त्यागातून, कष्टातून, कर्तृत्वातून नापीक असलेल्या वाळवंटाचे सुपीकतेमध्ये रूपांतर करण्याची क्षमता आपल्या शिक्षकांमध्ये आहे असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रामधील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments