google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर पहिला हप्ता उचलूनही ३ हजार घरकुलांचे बांधकाम नाही लाभार्थ्यांच्या मालमत्तांवर चढविणार बोजा

Breaking News

सोलापूर पहिला हप्ता उचलूनही ३ हजार घरकुलांचे बांधकाम नाही लाभार्थ्यांच्या मालमत्तांवर चढविणार बोजा

सोलापूर पहिला हप्ता उचलूनही ३ हजार

घरकुलांचे बांधकाम नाही लाभार्थ्यांच्या मालमत्तांवर चढविणार बोजा

आम्हाला राहायला घर नाही, शासन आमच्याकडे लक्ष देत नाही, अशी एक ओरड कायम असते. परंतु घरकुल मंजूर केल्यानंतर पहिला हप्ता घेऊन घरकुल न बांधणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत 

सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ३ हजार २३८ लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊन बांधकामाची एक वीटही रचली नसल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी, पहिल्या हफ्त्याची लाभार्थ्याकडून वसुली करण्यासाठी प्रशासनाने नोटीस देऊन मालमत्तेवर बोजा चढविण्याची तयारी सुरू केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतून सन २०२१-२२ मध्ये १० हजार ८२ घरकुलांचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. त्यापैकी ९ हजार ९४३ घरकुलांना जिल्हा परिषदेने मंजुरी दिली. तर ४ हजार ९६४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. 

या योजनेतून १ लाख २० हजार रुपये आणि स्वच्छ भारत अभियान, रोजगार हमीयोजना असे मिळून ३० हजार रुपये देण्यात येतात. एका घरासाठी दीड लाखाची रक्कम शासनाकडून दिली जात असून, पहिला हप्ता १५ हजार रुपये दिले जातो.

पहिला हप्ता उचलून एकही चोट न लावणाऱ्या लाभाथ्यांची संख्या दीड हजाराहून अधिक आहे. या लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतल्यानंतर बांधकामे सुरू करावीत, यासाठी ग्रामसेवकांमार्फत लेखी कळविण्यात आले. 

इतकेच काय गट विकास अधिकान्यांनी गावात भेटी देऊन बांधकाम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. परंतु यावरही लाभार्थ्याकडून प्रतिसाद दिसत नसल्याने आता १५ हजार रुपये वसुली करण्यात येणार आहे. 

आता काम पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना नोटीस बजावण्यात येत आहेत. परंतु यानंतरही बांधकाम सुरू न केल्यास संबंधित लाभार्थ्याच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचे तालुकानिहाय उद्दिष्ट

#अक्कलकोट ९९५

बार्शी ७१४

करमाळा ९८५

माढा ८८५

माळशिरस १०७०

मंगळवेढा : १०५०

मोहोळ १०१२

पंढरपूर: ९४९

सांगोला : ९०४

उत्तर सोलापूर ६०२

 दक्षिण सोलापूर : ९९६

एकूण १००८२

माढा, बार्शी सर्वात मागे

प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत घरकुलांची कामे पूर्ण करण्यात बार्शी आणि माढा खालुका सर्वांत मागे आहेत. बार्शी तालुक्यात ७१३ घरकुले मंजूर आहेत. 

त्यापैकी २९१ लाभार्थ्यांनी पहिला १५ हजार रुपयाचा हा उचलला आहे. केवळ ६८ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. तर माडा तालुक्यात ८४२ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी १५० लाभार्थ्यांनी पहिला हप्ता उचलला आहे. केवळ २५ लाभाय्यांनी घरकुलाची काम पूर्ण केली आहेत.

शेवटी गुन्हे दाखल करण्याचे प्रयोजन प्रधानमंत्री आवास योजनेतील १५ हजार रुपये वसुलीसाठी प्रथम ग्रामसेवक समज देतील. त्यानंतर लाभार्थ्यांना रीतसर नोटीस देण्यात येईल, त्यानंतर मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे. दरम्यान पुढे जाऊन हे प्रकरण लोक अदालतीमध्ये जाणार असून, शेवटी गुन्हे दाखल करण्याचे प्रयोजन आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पहिला हप्ता उचललेले लाभार्थी

अक्कलकोट ६८६, बार्शी २९१. करमाळा ५४५ माढा : १५०, माळशिरस ५६४, मंगळवेढा : ५८८. मोहोळ ४२९. पंढरपूर ६३३, सांगोला ४२७ उत्तर सोलापूर: १०५, दक्षिण सोलापूर ४७६, एकूण ४९६४

घरकुलांची पूर्ण झालेली कामे

अक्कलकोट १८८, बार्शी ६८ करमाळा १६२ माढा २५ र २२८, मंगळवेढा : १७६, मोहोळ १०५. पंढरपूर ३८८, सांगोला ११०, उत्तर सोलापूर: १०८, दक्षिण सोलापूर: १५३, एकूण १७२६ई

Post a Comment

0 Comments