धक्कादायक ! बावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील घटना...
मंगळवेढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुण शेतकऱ्याने दारूच्या नशेत औषध पिऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सलगर बु येथे घडली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अक्षय सिध्दाप्पा बिराजदार (वय 22 रा.सलगर बु ता.मंगळवेढा) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.28 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 च्या पुर्वी फिर्यादीचा भाऊ अक्षय बिराजदार याने त्याचे शेतामध्ये लक्ष्मीच्या मंदिराजवळ लिंबाचे झाडाखाली बसुन दारूच्या नशेत औषध पिल्याने त्यास औषध उपचारा साठी प्राथमिक आरोग्य केंद्र सलगर बु येथे आणले असता
तेथील डॉक्टरांनी त्यास तपासले असता तो उपचारापुर्वी मयत झाला असल्याचे घोषित केले. याची खबर शिवराज निलाप्पा बिराजदार (वय 28 रा-सलगर बु | ता.मंगळवेढा) याने मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय येलपळे हे करीत आहेत.


0 Comments