सांगोल्याचे कराटे शिक्षक वाघमारे सर 'राजे छत्रपती' पुरस्काराने सन्मानित
सांगोला (प्रतिनिधी): रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी वारणा मल्टीपर्पज हॉल सांगली येथे शिवजयंती निमित्त झालेल्या छत्रपती चषक खुल्या स्पर्धा 2023 रोजी संपन्न झाल्या यामध्ये 22 मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षकांना राजे छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
यामध्ये सांगोल्याचे जी.के. वाघमारे सर त्यांच्या 27 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल त्यांना राजे छत्रपती पुरस्कार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर मा. दिग्विजय सूर्यवंशी, सांगली काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष माननीय पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते राजे छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गेली 25 वर्षे झाले वाघमारे सर सांगोला येथे कराटेचे प्रशिक्षण देत आहे. सांगोल्यातील मुला मुलींना सक्षम बनवायचे कार्य करीत आहेत. वाघमारे सरांच्या अतिउच्च कार्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षक राजे छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजकीय, क्रीडा, शिक्षक, सामाजिक क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.


0 Comments