सांगोला शहरातील मदने चौक येथील सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन संपन्न झाले.
सांगोला शहरातील मदने चौक येथील माजी उपनगराध्यक्ष कै. लक्ष्मण सदाशिव मदने सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन जेष्ठ विधीज्ञ उदयबापु घोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, ग्रंथमित्र गुलाबराव पाटील (सर), मोहन मस्के (सर), सतिश भाऊ सावंत यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना उदयबापु घोंगडे यांनी दर्जेदार वाचनालय स्थापन झाल्यास लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती नव्याने उभारी घेईल अशी आशा व्यक्त केली तसेच या वाचनालयातील विविध विषयांवरची पुस्तके पाहुन समाधान व्यक्त केले.
आपल्या भाषणातकेली तसेच या वाचनालयातील विविध विषयांवरची पुस्तके पाहुन समाधान व्यक्त केले. आपल्या भाषणात अॅड. सचिन देशमुख यांनी कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक आणि मानसिकदृष्टया व्यक्तीला परिपक्व होण्यास वाचन मदत करते.
प्रत्येक पुस्तके आपल्याला शिकण्यासाठी नवीन संधी देत असते तसेच या वाचनालयास सर्वोतोपरी मदत करू असे सांगितले. जेष्ठ पत्रकार मोहन मस्के सर, माजी नगरसेवक सतिश भाऊ सावंत यांनी आपल्या मनोगतात या वाचनालयास सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.


0 Comments