सांगोला तालुक्यातील जप्त केलेल्या वाळू साठ्याचा होणार लिलाव..
तहसीलदार मा.अभिजीत पाटील
सांगोला येथील शासकीय धान्य गोदाम सांगोला या ठिकाणी 45 ब्रास वाळू साठ्याचा लिलाव करण्याबाबत तहसीलदार यांनी त्यांच्याकडील पत्र. क्र. गौख / कावी / 289/2023 दि. 09/03/2023 रोजी कार्यालयास कळविले आहे.
सांगोला तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकी मधील जप्त केलेल्या 45 ब्रास वाळूचा लिलाव 28/03/2023 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांचे निजी कक्षात करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक व्यक्तींनी वर नमूद ठिकाणी असणाऱ्या वाळू साठ्याची पाहणी करावी. व लीलाबात भाग घेण्याकरिता दि. 24 /03/2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा
यांच्याकडे सादर करावा.लिलावाच्या अटी शर्यती
1) लिलावाची 45 ब्रास वाळूची अपसेट प्राईस 27 हजार रुपये असणार आहे.
2) प्रस्तुत लिलावात भाग घेण्याकरिता वर नमुद ठिकाणी व वेळी उपस्थित राहून लघुतम किमतीच्या अपसेट प्राईसचे 25% रक्कम लिलावामध्ये भाग घेतेवेळी रोख अथवा डी. डी. द्वारे जमा करणे गरजेचे आहे.
3) प्रस्तुत लिलावात भाग घेऊन लिलाव घेणारे व्यक्तीस त्याच दिवशी त्यांनी बोललेल्या सर्वोत्तम बोलीच्या 25% रक्कमतात्काळ शासकीय खजिन्यात त्याच दिवशी चलनाद्वारे जमा करावी लागणार आहे.
4) लिलावातील सर्वोत्तम बोलीची उर्वरित 75 टक्के रक्कम सात दिवसाच्या 07 शासकीय खजिन्यात भरणे आवश्यक आहे.
5) लीलावातील सर्वोत्तम बोलीची उर्वरित 75 टक्के रक्कम न भरल्यास लिलावात भाग घेतेवेळी भरलेली 25% रक्कम परत केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
6) लिलावाची रक्कम भरल्यानंतर व या कार्यालयाकडील आदेश प्राप्त झाल्यानंतर लिलावातील वाळू वर नमूद ठिकाणावरून लिलाव धारकाने त्यांच्याकडील वाहनाद्वारे उचल व वाहतूक करायची आहे.
7) सदर लिलावातसर्वोच्च बोली बोलल्यास त्या बोलीची रकमेव्यतिरिक्त सोलापूर जिल्हा गौण खनिज प्रतिष्ठान निधी रक्कम 10 टक्के चा धानदेश या कार्यालयात सादर करणे जरुरी आहे.
8) लिलावात भाग घेण्याच्या अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
1) अर्जाचे शुल्क 2000 रोखीने भरणे आवश्यक (विनापरतावा)
2) अर्जदाराची पॅन कार्ड झेरॉक्स साक्षांकित प्रत जोडावी.
3) अर्जदाराची आधार कार्ड झेरॉक्स साक्षांकित प्रत जोडावी.
4) अर्जदार यांनी 100 रु स्टॅम्पवर GST (18%)भरणेबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करावे.
5) बँकपासबुकचीपहिल्या पानाची बॅलन्स सीट असलेल्या पानाची प्रत जोडावी.


0 Comments