सांगोला राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक ०८/०४/२०२३ मे
१०/०४/२०२३ संपन्न होणार अशी माहिती पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली
महाराष्ट्रातील समाजमन घडविण्यात मराठी साहित्य साहित्य संमेलनाचे अनन्यसाधारण योगदान ध्यानात घेता समस्त साहित्यिक मंडळी बाबत कृतज्ञता व्यक्त करून त्यांना, मराठी भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी चालवलेला यह आणखी जोमाने तेवत ठेवण्यासाठी आणखी बळ मिळावे
यासाठी प्रस्तुत राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन सांगोला येथे सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात दिनांक ०८/०४/२०२३ ते १०/०४/२०२३ या दरम्यान आयोजित केले आहे.
सदर संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने सांगोला शहरातील महात्मा फुले चौकापासून केली जाईल आणि संमेलनाची सांगता आपल्या सोलापूर परिसरातील काही ज्येष्ठ साहित्यिकांना साहित्य गौरव पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे
सदर संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. आमदार शहाजी बापू पाटील असतील आणि मा बाबुरावजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती स्थापन केली असून त्यामध्ये तालुक्यातील सर्व " साहित्यिक व इतर मान्यवरांचा समावेश केला आहे.
दिनांक ०८/०४/२०२३ रोजी सदर साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून समारोप व साहित्य गौरव पुरस्कार प्रदान सोहळा दि.१००४ २०२३ रोजी दुपार नंतर संपन्न होणार आहे. सविस्तर कार्यक्रम पत्रिका आठ दिवसात स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली जाईल.
पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित मान्यवर
मा. बाबुराव (भाऊ) गायकवाड, मा. उदय बापू घोंगडे, मा.आनंद लोकरे गटविकास अधिकारी साहेब, दादासाहेब रोंगे, माजी नगरसेवक सोमनाथ यावलकर, गजानन भाकरे सर, प्राचार्य धनाजी चव्हाण सर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली
0 Comments