सोलापूर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची क्रियाशील सभासद नोंदणी
मोठ्या प्रमाणावर करणारा: जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले
सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
रिपब्लिकन पक्षाची क्रियाशील सभासद नोंदणी सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू असून ही सभासद नोंदणी पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी दिली.
सांगोला तालुका रिपब्लिकन पक्षाच्या आयोजित कार्यकारणीच्या मीटिंगमध्ये दिनांक 26 मार्च रोजी सांगोला पंचायत समिती बचत भावनांमध्ये बोलत होते.
यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, पक्ष निरीक्षक सांगोला तालुका तथा पश्चिम महाराष्ट्र सचिव चंद्रकांत वाघमारे, जिल्हा सरचिटणीस श्यामसुंदर गायकवाड,
जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेळके, आरपीआयचे मातंग आघाडीचे राज्याचे नेते दामोदर साठे, बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका आरपीआय अध्यक्ष खंडू तात्या सातपुते आधी उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशानुसार आज दिनांक 26 मार्च रोजी सांगोला येथे पक्षाची बैठक आयोजित केलेली होती.
या बैठकीमध्ये आरपीआयची क्रियाशील सभासद नोंदणी वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आगामी सांगोला तालुक्यातील सर्व निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरावे असे सर्वांमते ठरले.
यावेळी उपस्थित जिल्ह्याचे नेते दिगंबर गवळी, जिल्हा नेते सतीश काटे , जिल्हा नेते शंकर फाळके, पश्चिम महाराष्ट्र नेते अण्णा गस्ते, मोहोळ युवक तालुकाध्यक्ष तात्यासाहेब काळे, युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष नवा सरतापे, तालुका कार्याध्यक्ष विकास सावंत ,तालुका सरचिटणीस सुरज होवाळ,
तालुका कोषाध्यक्ष विनोद उबाळे, तालुका संघटन सचिव सदाशिव सावंत ,युवक आघाडी तालुकाध्यक्ष सौदागर सावंत, सरचिटणीस दीपक व्हणकटे ,तालुका संघटन सचिव शशिकांत साबळे ,कोषाध्यक्ष सखाराम लांडगे, डॉक्टर सुरेंद्र ढोबळे ,स्वप्निल सावंत,
अर्जुन लांडगे ,बंडोपंत लांडगे, मोहन कांबळे, दीपक कांबळे ,शहाजी माने ,गौतम जगधने, पिंटू जगधने, विशाल जगधने ,बाबा सरतापे ,विशाल सरतापे, विवेकानंद क्षीरसागर ,तेजस आढाव, महेश पाटोळे, तेजस तोरणे, आबा चव्हाण, गौतम चंदनशिवे ,
दत्ता सावंत, सदाशिव शेळके, महेंद्र सावंत, दत्ता मोरे, बापू होवाळ, अतुल सावंत, डॅशर धांडोरे, उल्हास गाडे, डॉन केंगार, बजरंग गायकवाड ,आशिष गायकवाड बाळू होवाळ ,अजित साबळे, तुकाराम डहाळे ,अमोल कांबळे ,शहाजी सावंत, आबा बनसोडे ,पोपट गगणे ,
अजय पारशे, तानाजी इरकर, प्रवीण सरतापे, लक्ष्मण वाघमारे, समाधान होवाळ, शुभम होवाळ ,केतन कसबे, पंकज चव्हाण, समाधान करडे , युवक नेते संजय कर्डे, संदेश माने यांच्यासह सांगोला तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments