धक्कादायक प्रकार सांगोला तालुक्यात जुनोनी येथे खोटे दागिने देवून फसवणूक
आठवडा बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेला दोघा अनोळखी व्यक्तींनी सोने विकायचे असल्याची थाप मारून तिच्याकडील खरे सोन्याचे दागिने घेवून तिला खोटे दागिने देवून दोघा पोबारा केला.
ही घटना २७ मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास जुनोनी ता. सांगोला येथील आठवडा बाजारात घडली. याप्रकरणी सिताबाई नामदेव शेळके रा.काळुबाळूवाडी, जुनोनी ता. सांगोला यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, काळुबाळूवाडी, जुनोनी ता. सांगोला येथील सिताबाई नामदेव शेळके या२७ मार्च रोजी दुपारी एक वाजता आठवडा बाजारातभाजीपाला आणण्यासाठी गेल्या होत्या.
भाज्या खरेदी करीत असताना तेथे एक अनोळखी इसम व एक अनोळखी महीला त्यांच्या जवळ आले व त्यांनी माझी मुलगी लग्न न होता गरोदर आहे, तिचे बाळ खाली करायचे आहे, सरकारी दवाखाना कोठे आहे असे विचारले.
त्यावर शेळके यांनी त्यांना मला दवाखाना माहीत नाही, असे सांगीतले. त्यावेळी त्यांनी दवाखाना राहू देत माझ्याकडील सोने विकायचे आहे, मला सोनाराचे दुकानात घेवुन चल असे म्हणाले. त्यावेळी तेथे असलेला अनोळखी इसम हा मी सोनार आहे,
माझ्या दुकानात चल असे म्हणाल्यावर अनोळखी महीला वसिताबाई शेळके असे त्याच्या पाठीमागे गेले. जुनोनी ते पंढरपूर रोडवर अनोळखी महीला व अनोळखी इसम यांनी सिताबाई शेळके यांच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळे वजनाचे गंठण,
सोन्याचे एक तोळा वजनाचे कानवेल-फुले-साखळ्या असे दागीने काढून घेतले. त्यानंतर त्यांनी त्याचेकडील खोटे दागीने सिताबाई शेळके यांना देवून ते दोघेजण निघून गेले. त्यानंतर शेळके यांनी मुलगा दगडू, भाचा दादासो कोळेकर यांना घडलेला प्रकार सांगितला.


0 Comments