google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संजय राऊत यांचे नाव बदलून आगलावे करा ! शिवसेना पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेसच्या दावणीला बांधला होता आमदार मा.शहाजीबापू पाटील

Breaking News

संजय राऊत यांचे नाव बदलून आगलावे करा ! शिवसेना पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेसच्या दावणीला बांधला होता आमदार मा.शहाजीबापू पाटील

 संजय राऊत यांचे नाव बदलून आगलावे करा ! शिवसेना  पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेसच्या दावणीला बांधला होता आमदार मा.शहाजीबापू पाटील 

सांगोला:- संजय राऊत हे कधीच म तो श्रीशी एकनिष्ठ आहेत, असे मला वाटत नाही. मातोश्रीचे राजकारण उद्ध्वस्त करण्याची सुपारी खऱ्या अर्थाने संजय राऊतांनी उचललेली आहे. 

संजय राऊतांचे आडनाव बदलून नामकरण करण्याची वेळ आली आहे. राउताचं आडनाव बदलून आगलावे करावे. शिवसेना  पक्ष राष्ट्रवादी, आय काँग्रेसच्या दावणीला बांधलेला होता असे वक्तव्य आ. शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांविषयी केले.

आ. शहाजीबापू पाटील म्हणाले, शिवसेना हा पक्ष संजय राउताने राष्ट्रवादी, आय काँग्रेसच्या दावणीला बांधलेला होता. तो ठाकरेंचा पक्ष

 राष्ट्रवादी, काँग्रेसच्या दावणीला बांधला

 पक्ष सोडवून आणण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. शिवसेना पक्ष संपवण्याचे काम केल्यामुळे संजय रावताला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय तरी बक्षीस नक्कीच देईल. 

राष्ट्रवादी पक्षामध्ये तीन-चार लोक मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघत आहेत. ती दिवास्वप्ने राहणार आहेत. पवार साहेब कोणालाच मुख्यमंत्रीपद देणार नाहीत ही तर त्यांची राजकारणातील खुबी आहे, असेही आ. शहाजीबापू म्हणाले.

Post a Comment

0 Comments