सांगोला तालुक्यात शिवणे येथे दूध डेअरी चालकास मारहाण
सांगोला-शिवणे :- दूध डेअरीला दूध घालतो असे म्हणून उचललेले पैसे मागितल्याच्या कारणावरून दूध डेअरी चालकाला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून परत पैसे मागीतले तर तुझ्या अंगावर ट्रक घालुन तुला मारुन टाकीन, अशी धमकी दिली.
याप्रकरणी सुरेश शिवाजी घाडगे रा. शिवणे ता. सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिरा राजाराम जानकर रा. शिवणे ता. सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुरेश शिवाजी घाडगे रा. शिवणे ता. सांगोला यांची दुध डेअरी असून ते दूध संकलनाचे काम करीत आहेत. मागील पाच वर्षांपासून बिरा राजाराम जानकर याने डेअरीत दुध घालतो म्हणुन वारंवार पैसे उचलले होते.
सदरचे पैसे वारंवार मागणी hi असता बिरा जानकर याने रक्कम परत दिली नाही. सुरेश घाडगे हे दूध संकलन करीत असताना त्यांनी बिरा जानकर यास फोन करुन डेअरीत दुध घालतो म्हणून उचललेले आहे. पैसे जमा करा, असे सांगितले.
त्यावेळी बिरा जानकर याने मी पैसे जमा करत नाही, मी पैसे देणे लागत नाही, असे म्हणुन फोनवरून शिवीगाळी केली. त्यानंतर बिरा जानकर हा दूध डेअरीवर येवून तू माझ्याकडे पैसे का मागीतले, मी तुमचे देणे लागत नाही.
असे म्हणुन शिवीगाळी दमदाटी करुन सुरेश घाडगे यांना हातानेलाथाबुक्क्यांनी मारहाण करून तेथेच पडलेल्या लाकडी काठीने पायावर, पाठीत मारहाण केली. परत माझ्याकडे पैसे मागीतले तर मी ड्रायव्हर आहे, तुझ्या अंगावर ट्रक घालून तुला मारुन टाकीन, अशी धमकी दिली.
सदरची भांडणे दादासाहेब घाडगे, शिवाजी घाडगे, रोहीत शिंदे, सुनिल पवार यांनी सोडवासोडवी केली. या भांडणात सुरेश घाडगे यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन तुटून पडुन कोठेतरी गहाळ झाली.
याप्रकरणी सुरेश शिवाजी घाडगे रा. शिवणे ता. सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिरा राजाराम जानकर रा. शिवणे ता.सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


0 Comments