Breaking News

सांगोला - डोंगरगावचा बॉडीबिल्डर संकेत संजय काळे ठरला नॅशनल चॅम्पियन

सांगोला - डोंगरगावचा बॉडीबिल्डर संकेत संजय काळे ठरला नॅशनल चॅम्पियन

सांगोला (प्रतिनिधी): बुधवार दि. 22 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक मेन चॅम्पियनशिप 2022-23 या स्पर्धेत  बॉडीबिल्डर संकेत संजय काळे याने रौप्य पदक जिंकून नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून उज्वल यश संपादन केले आहे.

सदरची स्पर्धा येनेपोया डिम्ड. टू. बी. युनिव्हर्सिटी मेंगलोर, कर्नाटक येथे संपन्न झाली. या स्पर्धेत देशातील सर्व युनिव्हर्सिटीचे बॉडीबिल्डर सहभागी झाले होते. त्यात सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे चे  नेतृत्व करत या स्पर्धेत सहभाग नोंदवून संकेतने तिसरा नंबर मिळवून शालेय नॅशनल चॅम्पियनशिप वर आपले नाव सुवर्ण अक्षराने नोंदवले आहे.

  या यशाबद्दल सर्व स्तरामधून क्रीडाप्रेमी, पालक, सामाजिक कार्यकर्ते व नेतेमंडळी यांचे कडून त्याचे कौतुक होते आहे. यापूर्वीही इंडियन बॉडी बिल्डर अँड फिटनेस फेडरेशनने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ही जुनियर "भारत श्री"होण्याचा मान बॉडी बिल्डर संकेत संजय काळे यांनी मिळवला आहे.

 या स्पर्धांव्यतिरिक्त विद्यापीठ स्तर, राज्य स्तर व राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन 25 पेक्षा अधिक पदकांची कमाई केली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी संकेत हा रोल मॉडेल ठरला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

Post a Comment

0 Comments