google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 किराणा दुकानाला लागली आग , तेलामुळे उडाला भडका, मोहोळ तालुक्यातील घटना

Breaking News

किराणा दुकानाला लागली आग , तेलामुळे उडाला भडका, मोहोळ तालुक्यातील घटना

 किराणा दुकानाला लागली आग , तेलामुळे उडाला भडका, मोहोळ तालुक्यातील घटना

सोलापूर/कामती - टाकळी सिकंदर येथील वाघमोडे किराणा मालाच्या दुकानास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे

सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही.

टाकळी सिंकदर येथील शिवाजी चौकातील दिलीप वाघमोडे (रा.पुळूज ता. पंढरपूर) यांच्या मालकीच्या किराणा दुकानाला सकाळी ८ च्या दरम्यान अचानक आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे समजते. किराणा दुकानास लागलेली ही आग मोठी असल्याने भिमा सहकारी साखर

 कारखान्याच्या अग्नीशमन दलाच्या एका बंबास आटोक्यात आली नाही. दुकानातील किराणा मालाने पेट घेतल्याने आग जास्तच भडकली.

दरम्यान, दुकानात गोडे तेल, खोबरेल तेल मोठ्या प्रमाणात असल्याने बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. उपस्थीत जमावाने ही लागलेली आग नियंत्रित आणण्यास मोठे प्रयन्त केले

Post a Comment

0 Comments