google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अनैतिक संबंधाच्या संशयावरून क्रूर हत्या, मृतदेहाचे केले 16 तुकडे

Breaking News

अनैतिक संबंधाच्या संशयावरून क्रूर हत्या, मृतदेहाचे केले 16 तुकडे

 अनैतिक संबंधाच्या संशयावरून क्रूर हत्या, मृतदेहाचे केले 16 तुकडे

आंध्रप्रदेश - अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाची निर्घृणपणे हत्या करीत त्याला जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या हत्याकांड प्रकरणात 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.पालनाडू जिल्ह्यातील दाचेपल्ली यागावात हे भयावह हत्याकांड घडले.

बोंबेथुला सैदुलू व कोटेश्वर राव हे दोघे पंचायतीमध्ये आऊटसोर्स म्हणून काम करतात, शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास कोटेश्वर राव हा पाण्याच्या टाकीवरील मोटार बंद करण्यासाठी गेला होता, त्यावेळी सैदुलू व त्याचा सहकारी हा घात लावून बसला होता, दोघांनी मिळून कोटेश्वर च्या डोक्यावर लोखंडी रॉड ने जोरदार प्रहार केला.

या हल्ल्यात कोटेश्वर चा जागीच मृत्यू झाला.हत्येनंतर कोटेश्वर चा मृतदेह आरोपीनी पोत्यात टाकून मिरचीच्या शेतात नेत मृतदेहाचे 16 तुकडे केले. काड्या जमा करीत पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकला, रात्र झाल्याने कोटेश्वर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी विचारपूस सुरू केली.

याबाबत कोटेश्वर च्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली, कोटेश्वर चा शोध घेत कुटुंब आरोपींच्या घरी सुद्धा गेले मात्र त्याना याबाबत काही माहिती मिळाली नाही.

पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता शेतात आग असल्याने त्यांनी जाऊन बघितले त्याठिकाणी एक हात पोलिसांना दिसला. 

पोलीस तात्काळ सैदुलू च्या घरी पोहचले, त्याठिकाणी सैदुलची पत्नी कपडे जाळताना दिसली, त्या कपड्यावर रक्ताचे डाग होते, सैदुलू मुलाला सोबत घेत पळण्याच्या तयारी होता पोलिसांनी दोघांना तात्काळ अटक करीत चौकशी सुरू केली.

कोटेश्वर ची हत्या अनैतिक संबंधाच्या संशयातून झाला असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे, या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments