आजच्या युवा पिढीमध्ये उद्याचे भविष्य घडवण्याची शक्ती आहे -डॉ. बाबासाहेब देशमुख
सांगोला न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला मधील माहिती तंत्रज्ञान विभागातील इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे लाभले होते.
प्रारंभी महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक हेमंत आदलिंगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
युवकांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे, महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला मध्ये माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, भविष्यातील उज्वल भारत बनवण्याची खूप मोठी शक्ती आजच्या युवा पिढीमध्ये आहे.
त्यांनी या शक्तीचा वापर करून विद्यार्थी दशेत असताना जिद्द,चिकाटी, प्रामाणिकपणा यांच्या मदतीने आपले भावी आयुष्य समृद्ध केले पाहिजे, तसेच आपल्यामध्ये असलेल्या या शक्तीचा वापर सामाजिक बांधिलकी जपून विधायक कार्यासाठी करावा.
इयत्ता बारावी शास्त्र मधील सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व भावी आयुष्यामध्ये तुम्हाला कोणतेही गरज भासल्यास तुम्ही मला प्रत्यक्ष भेटू शकता, असे आश्वासन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिले.
यावेळी संस्था सदस्य प्राध्यापक डॉक्टर अशोक शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले,याप्रसंगी डॉक्टर अजिंक्य नष्ठे,डॉक्टर अनुप तोरणे,
डॉक्टर रीना तोरणे,
डॉ चंद्रकांत धांडोरे साहेब (पशुधन अधिकारी),
श्री निलेश डोंगरे सर,
प्राचार्य एल टी गावडे सर
उपप्राचार्य हेमंत आदलिंगे सर,
प्रा संतोष जाधव सर ,प्रा चंद्रकांत इंगळे सर ,प्रा अरुण बेहेरे सर,प्रसिद्धी विभाग प्रमुख प्राध्यापक देवेन लवटे माहिती तंत्रज्ञान विभागातील इयत्ता अकरावी व बारावी मधील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता जांभळे व जान्हवी बनकर प्रास्ताविक इंग्लिश मध्ये मेथली तेली, ओम वाघमारे, हिंदी मध्ये रीदा तांबोळी,मनोगत माधुरी भोसले, वेदांती चव्हाण,रोहिणी बाबर,मयुरी बंडगर योगेश शिंदे तर आभार मयुरी बंडगर हिने मानले. हा सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक चंद्रशेखर माळगे यांचे अनमोल सहकार्य लाभले.


0 Comments