सांगोला घेरडी श्याम पेट्रोलियम एचपी पेट्रोल पंप येथे चार लुटेरे पेट्रोल पंपावर दरोडा टाकून दोन लाख लुटले
सांगोला / प्रतिनिधी अज्ञात चार व्यक्तींनी पेट्रोल पंपावरील कर्मचान्याच्या गळ्याला चाकूचा धाक दाखवून २ लाख १६ हजार रुपयांची लुट केली.
ही घटना मंगळवार दि. २१ फेब्रुवारी पहाटे २ च्या सुमारास श्याम पेट्रोलियम (एचपी पेट्रोल पंप) घेरडी (ता. सांगोला) येथे घडली. पंपावरील कर्मचारी हर्षद गजानन सोनवणे रा. घेरडी याने अज्ञात चार व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, घेरडी येथे शाम पेट्रोलियमफर्मचा एचपी पेट्रोल पंप आहे. दि. २० रोजी कामगार हर्षद सोनवणे व त्याचा सहकारी कामगार चैतन्य सरगर
हे दोघे दिवसभराची विक्री रुपये २ लाख १६ हजार पंपाच्या ऑफिस लॉकरमध्ये ठेऊन ऑफिस मध्येच झोपले होते. दरम्यान दि. २१ रोजी पहाटे २ वाजता तोंडाला रुमाल, डोक्याला कानटोपी बांधलेले तीन इसम ऑफिस बाहेर येऊन हका मारू लागले.
यावेळी फिर्यादी सोनवणे हा जागा झाला व त्याने तुम्हाला काय पाहिजे असे विचारले. यावेळी आलेल्या व्यक्तींनी पेट्रोलपाहिजे असे सांगताच फिर्यादीने ऑफीसचा दरवाजा उघडला.
फिर्यादी बाहेर येताच आलेल्या तिघा पैकी एकाने त्याच्या गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी केली. यावर कामगाराने पैसे आमचे जवळ नसतात लॉकर मध्ये ठेवलेले असतात असे सांगितले. यावर तिघांनी मिळून फिर्यादीस गळ्याला चालू लावलेल्या अवस्थेत पुन्हा ऑफिस मध्ये आणले.
यावेळी त्यांनी ऑफीस मध्ये झोपलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्यास उठविण्यास सांगितले. याचवेळी तीन चोरा पैकी एकानेबाजूस असलेले लॉकर चावीने उघडून त्यातील २ लाख १६ हजार रक्कम काढून घेतली.
ही सर्व घटना घडत असताना एका चोरट्याने हर्षद सोनवणे यांच्या गळ्याला चाकू लावून धरलेला होता.
त्यानंतर तिघांनी फिर्यादीच्या गळ्याचा चाकू तसाच ठेवून त्यांनी आणलेल्या स्कॉपिओ गाडी पर्वत नेले. यावेळी गाडीमध्ये ड्रायव्हर सीट वरती एकजण अगोदरच बसला होता. गाडी जवळ येताच सोनवणे यास जोराने ढकलून दिले व सर्वजण (चौधे) गाडीत बसून घेरडी ते वाणी चिंचाळे रोडणे पळून गेले.
कामगार सोनवणे व सरगर या कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पंपाचे मॅनेजर पंजाबराव साळुंखे (रा. जवळा) यांना फोन करून सांगितली. त्यानंतर हर्षद सोनवणे याने सांगोला पोलिस स्टेशन येथे अज्ञात चार व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून २ लाख १६ गाजराची रक्कम लुटून नेली असल्याची तक्रार दिली आहे.


0 Comments