सांगोला चिकमहूद येथे भीषण अपघात; दोन जण जागीच ठार; एक गंभीर जखमी
सांगोला -महूद /प्रतिनिधी महूद-दिघंची राज्य महामार्गावरील चिकमहूद(ता. सांगोला)शिवारात बंडगरवाडी पाटी जवळ गुरुवार(ता.१६) रोजी सायंकाळी सहा वाजता सुमारास छोटा हत्ती व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात आजोबा व नातूचा जागीच मृत्यू झाला आहे.तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील उमेश बाळू लोखंडे (वय २०) तर त्याचे गार्डी येथे राहणारे आजोबा दत्तू हरिबा अडगळे(वय ७५) यांचे सह संजय गजेंद्र खंडागळे (वय३५,रा.खंडाळी ता. माळशिरस) हे तिघेजण नंबर नसलेल्या स्प्लेंडर प्लस वरून महूद मार्गे राजेवाडी(ता.आटपाडी)येथे वीट भट्टीवर मजुरीच्या कामासाठी निघाले होते.
चिकमहूदच्या पुढे असलेल्या धोकादायक वळणामध्ये बंडगरवाडी पाटी जवळ यांच्या मोटार सायकलचा व कटफळ हून महूद कडे येणाऱ्या छोटा हत्ती (क्र.एम.एच.१०,ए.क्यू.०८०९) यांचा जोरदार अपघात झाला. या अपघातात दत्तू हरिबा अडगळे व उमेश वाळू लोखंडे या आजोबा व नातूचा जागीच मृत्यू झाला.
तर संजय खंडागळे हा गंभीर जखमी झाले आहे.जखमीस खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छोटा हत्ती चालक सोमनाथ दिलीप कोकरे(रा.कटफळ,ता. सांगोला) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चौकट-
चिकमहूद-दिघंची मार्गावर कॅनॉल च्या पुढे धोकादायक वळणांचा ब्लॅक स्पॉट हा मृत्यूचा सापळा बनला आहे.या अर्धा किलोमीटर परिसरात आतापर्यंत असंख्य अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत.
सदोष रस्ता निर्मितीमुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही येथील अपघाताचा ब्लॅक स्पाॅट काढण्यासाठी संबंधित विभाग कोणतेही प्रयत्न करताना दिसून येत नाही.उलट राज्य महामार्गावर गतिरोधक निर्माण करून अपघातावर वेगळीच मात्रा या विभागांने शोधली आहे.
मृतदेहांची अवहेलना
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेला अपघातातील दोघां मजुरांचे मृतदेह सुमारे तीन तासानंतरही रस्त्याच्या कडेला पडून होते.पोलीस यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे या मजुरांच्या मृतदेहांची अवहेलना व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.


0 Comments