Breaking News

विज्ञान महाविद्यालय सांगोला अंतर्गत स्पर्धा परीक्षा समिती मार्फत सेट परीक्षेची तयारी या विषयावर मार्गदर्शनवर्ग संपन्न

विज्ञान महाविद्यालय सांगोला अंतर्गत स्पर्धा परीक्षा समिती मार्फत सेट परीक्षेची तयारी या विषयावर मार्गदर्शनवर्ग संपन्न

विज्ञान महाविद्यालय सांगोला अंतर्गत स्पर्धा परीक्षा समितीमार्फत दिनांक 16/2/2013 रोजी महाविद्यालयीन  काळात सेट परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावरती इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक शिंदे डी. आर. यांनी पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

    सदर मार्गदर्शन वर्गाचा उद्देश पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी जे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून करिअर करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना सेट परीक्षेबद्दल माहिती व्हावी ह्या हेतूने सदर कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाची सुरुवात समिती चेअरमन प्राध्यापक शेख जे.यु.यांनी कार्यक्रमाचे पाहुणे प्राध्यापक शिंदे डी. आर. यांना पुष्पगुच्छ देऊन केली. 

    सदर मार्गदर्शन वर्गामध्ये प्राध्यापक शिंदे डी. आर. यांनी महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच सेट पेपर भाग एक या विषयाची तयारी  करताना ऍप्टीट्यूड टेस्ट, लॉजिकल रीजनिंग, नंबर सेरीज ,लेटर अनालॉजी,नफा-तोटा, सरासरी, वेळ व घड्याळ इ. संबंधित प्रश्न विविध उदाहरणे विद्यार्थ्यांना देऊन सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास पदव्युत्तर विभागातील बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक शेख एन एस यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्राध्यापक रसाळ एन. एस. प्राध्यापक चव्हाण सी.डी. प्राध्यापक बंडगर एन. एच. प्राध्यापक भानवसे डी.पी. व इतर सहकारी प्राध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments