google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला औद्योगिक सह. वसाहत निवडणूक तीन उमेदवारांचे अर्ज नामंजूर

Breaking News

सांगोला औद्योगिक सह. वसाहत निवडणूक तीन उमेदवारांचे अर्ज नामंजूर

 सांगोला औद्योगिक सह. वसाहत निवडणूक तीन उमेदवारांचे अर्ज नामंजूर

 सांगोला औद्योगिक सहकारी वसाहत निवडणुकीत नुकत्याच पार पडलेल्या अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये ३ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. 

उर्वरित ३० उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. १३ मार्चपर्यंत अर्ज मापारी घेण्याची मुदत असल्याने १३ मार्च रोजी औद्योगिक सह वसाहत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 विकास सेवा सोसायटी त्यानंतर खरेदी-विक्री संघ आणि आता औद्योगिक सहकारी वसाहत अशा प्याटप्याने निवडणुकीचा कार्यक्रम पार पडत असताना, सांगोलाऔद्योगिक सहकारी वसाहत निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण ३३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये ३ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत.

 उर्वरित ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. सांगोला औद्योगिक सहकारी वसाहत निवडणूक प्रक्रियेमधील अर्ज माघार पेण्याची प्रक्रिया १३ मार्चपर्यंत असल्याने याच दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 सध्या सहा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका सुरू आहेत. यामध्येचसांगोला औद्योगिक सहकारी वसाहत निवडणुकीचेही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात २७ मार्चनंतर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वसाधारण एक महिन्याच्या कालावधीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रियादेखील सुरू होणार असल्याची माहिती सहायक निबंधक प्रकाश नालवार आहे.यांनी दिले

Post a Comment

0 Comments