google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक सांगोल्यात २४ दिवसांत १० महिला बेपत्ता

Breaking News

धक्कादायक सांगोल्यात २४ दिवसांत १० महिला बेपत्ता

धक्कादायक सांगोल्यात २४ दिवसांत १० महिला बेपत्ता 

 सांगोला :  घरगुती वादामुळे कंटाळून घर सोडणे आणि प्रियकरासोबत पळून शहरातील महिला हरविण्याचे प्रमाण (मिसिंग केस) वाढले आहे. सांगोला पोलिसांकडील आकडेवारीनुसार घरगुती वाद आणि प्रियकरासोबत निघून जाण्यात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.

 सांगोला तालुक्यात मागील २४ दिवसांत १० महिला हरवल्याची नोंद सांगोला पोलिसांत दाखल झाली आहे. पैकी २ महिलांना शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. उर्वरित महिलांचा पोलिस प्रशासन कसून तपास करीत आहे.

 पोलिसांकडून १८ वर्षांपुढील व्यक्ती गायब झाल्यास मिसिंगची तक्रार दाखल करण्यात येते. १८ वर्षांखालील वयोगटासाठी जाणीवपूर्वक अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. घरगुती भांडण आणि छळाला कंटाळून काही प्रमाणात महिला घर सोडून जात आहेत. 

प्रियकारसोबत पळून जाणाऱ्या महिलांची संख्या वाढत असल्याचेही दिसून आले आहे. अनेकदा मुली व महिला पळून गेल्याच्या घटना घडल्यानंतर पोलिसांत यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या नोंदी केल्या जात नाहीत. 

अनेकदा इज्जत आणि अब्रूपोटी तालुक्यातील अनेक प्रकरणे घरगुती आणी गाव स्तरावरच मिटवण्यात येत आहेत. असे असले तरी पोलिसांत हरवल्याच्या तक्रारी दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.

Post a Comment

0 Comments