रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोहिते पाटील यांना धक्का, सहकारी बँकेवर घातले निर्बंध अकलूज
मुंबई : आरबीआयने आज देशातील ५ सहकारी बँकांवर विविध निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांमध्ये पैसे काढण्यावर बंदी देखील समाविष्ट आहे. या बँकांवर निर्बंध ६ महिने कायम राहणार आहेत.
यामुळे या बँकेचे ग्राहक बँकेत जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. तसेच या बँका आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही नवीन ग्राहकाला कर्ज देऊ शकणार नाही.
या ५ बँकांवर घातले निर्बध बंदी
एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक लखनौ (यूपी),
आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित औरंगाबाद (महाराष्ट्र),
शिमशा को-ऑपरेटिव्ह बँक नियामिथा मद्दूर, (कर्नाटक)
उरावकोंडा. को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश)
शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र)
उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) चे ग्राहक आता त्यांच्या बँकेमधील ठेवींमधून फक्त ५ हजार रुपये काढू शकतात. याचा अर्थ असा की ग्राहकाच्या खात्यात कितीही रक्कम जमा केली असली तरी तो त्याच्या खात्यातून फक्त ५ हजार रुपये काढू शकणार आहे.


0 Comments