google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपालिकेचा विकास कामांचा दर्जा ढासळला सर्वच बांधकाम अभियंत्यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभार

Breaking News

सांगोला नगरपालिकेचा विकास कामांचा दर्जा ढासळला सर्वच बांधकाम अभियंत्यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभार

 सांगोला नगरपालिकेचा विकास कामांचा दर्जा ढासळला सर्वच बांधकाम अभियंत्यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभार

 सांगोला नगरपालिका येथे सर्वच बांधकाम अभियंत्यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारामुळे शहरातील विकास कामांचा दर्जा ढासळला असून आतापर्यंत झालेल्या सर्व विकास कामांची समिती नेमुन चौकशी करावी व या बांधकाम अभियंत्यांच्या गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शहरवासियांनी केली आहे.

 सांगोला नगरपालिकेत ठेकेदार असलेले बांधकाम अभियंता, नगर बांधकाम अभियंता व बांधकाम अभियंता यांनी हम करेसो कायद्याप्रमाणे काम सुरु केले आहे. मर्जीतील लोकांकडून अर्थपुर्ण वाटाघाटी करून मदत करणे, जे अर्थपूर्ण वाटघाटी करीत नाहीत

 त्यांचीआडवणे जे नागरिक पैसे देतात त्यांची नियमबाह्य कामे करणे, वापर परवान्यासाठी पैशाची मागणी करणे. जे पैसे देत नाहीत त्यांना नियम दाखवणे, गुंठेवारीसाठी लाखो रूपयांची मागणी करणे, जे पैसे देत नाहीत त्यांना नियम दाखवले जातात.

 सांगोला शहरात रस्ते, गटारी, डांबरी रस्ते आदि विकास कामे या बांधकाम अभियंत्याच्या अर्थपुर्ण वाटाघाटीमुळे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. नगरपालिकेच्या बांधकाम विभागात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. ठेकेदारी पध्दतीने असलेले बांधकाम अभियंता हे नागरिकांची मध्यस्ती करून अधिकाऱ्यांबरोबर अर्थपुर्ण वाटाघाटी

पध्दतीने असलेले बांधकाम अभियंता हे नागरिकांची मध्यस्ती करून अधिकाऱ्यांबरोबर अर्थपुर्ण वाटाघाटी करतात व जे नागरिक पैसे देतात त्यांचीच कामे केली जातात, जे नागरिक पैसे देत नाहीत त्यांच्याबद्दल चुकीची माहिती मुख्याधिकाऱ्यापर्यंत पोहचवली जातात असे अनेक प्रकार बांधकाम विभागात सुरू आहेत.

 या बांधकाम अभियंत्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व कामांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी एक मार्च रोजी नगरपालिकेसमोर नागरिकांच्यावतीने उपोषण करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments