धक्कादायक.. रात्र ठरली त्या शेतकऱ्यासाठी काळ रात्र शेतातील झोपडीला आग लागून शेतकऱ्यांसह श्वानाचा होरपळून मृत्यू..
आधीच आस्मानी संकट त्यात नापिकी कसे बसे पिक आले तर त्याला भाव नाही सरकार तर या शेतकऱ्याची थट्टा करतेच पण निसर्ग देखील या बळीराजाला दुखावतो म्हणायला
बळी राजा पण यातना मात्र आयुष्यभर या यातनेला कंटाकून कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात तर काहींना नाहक आपले प्राण गमवावे लागले असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला असून कालची रात्र या शेतकऱ्या साठी काळरात्र ठरली
मलकापूर तालुक्यातील दुधगाव येथे शेतातील झोपडीला आग लागून ३५ वर्षीय शेतकरी व एका श्वानाचा घोरपळुन मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांच्या वतीने घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब व श्वान पथकाला सुद्धा पाचरण करण्यात आले आहे..
मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील 35 वर्षीय शेतकरी गणेश विजय नारखेडे हे रात्रीच्या सुमारास शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.. रात्री उशीर झाल्याने ते झोपडीत झोपले होते. दरम्यान झोपडीला आग लागून या आगीतच त्यांचा व एका श्वानाचा घोरपळून मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली.
सकाळच्या सुमारास शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना ही बाब निदर्शनास येताच घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. घटना कळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एफ सी मिर्झा यांनी आपल्या टीम समवेत घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
तर झोपडीला आग कशाने लागली ही बाब अद्यापही अस्पष्ट असली तरी मृतकाच्या हातात विद्युत वाहिनीची तार आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.
त्यामुळे शॉर्टसर्किटच्या कारणास्तव आग लागली की इतर दुसऱ्या काही कारणाने आग लागली या दिशेने पोलीस यंत्रणा तपास करीत आहे..पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक मिर्झा यांच्या मार्गदर्शनात मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहे..


0 Comments