"आता मंत्रिमंडळ विस्तार २०२४ मध्येच होईल.." बच्चू कडू यांचं मोठं विधान !
बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार याकडे सत्ताधारी व विरोधक पक्षांचं लक्ष लागून आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक तारखा सत्ताधारी
शिंदे - फडणवीस सरकारमधील नेत्यांनी सांगितल्या असून सत्ताधारी पक्षातील आमदार अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान शिंदे गटातील प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मोठं विधान केलं आहे.
आमदार बच्चू कडू नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते. बच्चू कडू म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या बंडखोरीचा चांगला विचार केला, मला काय भेटलं यापेक्षा माझ्या दिव्यांग बांधवांना मंत्रालय आलं ही माझ्या आयुष्यातील मोठी गोष्ट आहे.
निवडणूक आयोग आणि न्यायालय यांचे ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. निकाल येत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं सध्यातरी दिसतंय आणि या निकालानंतरही विस्तार झाला नाही, तर मग तो २०२४च्या निवडणुकांनंतर होईल.."


0 Comments