google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ठाकरे vs शिंदे : शिवसेना ठाकरेंचीच?

Breaking News

ठाकरे vs शिंदे : शिवसेना ठाकरेंचीच?

 ठाकरे vs शिंदे : शिवसेना ठाकरेंचीच?

शिवसेना पक्ष कुणाचा आणि चिन्ह कोणाचे याचा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे.

 मागील सुनावणीत शिंदे गटाने बाजू मांडली असून, आजच्या सुनावणीत ठाकरे गट आपली बाजू मांडत आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल निवडणूक आयोगासमोर बाजू मांडत आहेत. यावेळी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असून, फुट पडली आहे, तिला काहीच अर्थ नाही, असे सिब्बल यांनी म्हटले.

 दरम्यान, १० तारखेला झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी आमच्याकडे संख्याबळ आहे, असे म्हटले होते. त्यांचा हाच मुद्दा आज सिब्बल यांनी खोडून काढला आहे. दरम्यान ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षावर आज निवडणूक आयोगाचा निर्णय येणे अपेक्षित होते.

 मात्र आयोगाने याचा निर्णय पुढील सुनावणीपर्यंत टाळला आहे. शिवसेना व धनुष्यबाणावर कुणाचा अधिकार याचा निर्णय लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार आहे.

Post a Comment

0 Comments