google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण जनजागृती साठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन

Breaking News

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण जनजागृती साठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन

सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण जनजागृती साठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन

सांगोला/प्रतिनिधी –सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण जनजागृती साठी दि. 17/01/2023 रोजी 9:00 वाजता भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

पर्यावरण समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जल, पृथ्वी, आकाश ,अग्नी वायू या पंच तत्त्वावर आधारित माझी वसुंधरा 3.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2023 या अभियानात नगरपरिषदे सहभागी झाली आहे. या अभियाना अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेमार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. 

याचाच एक भाग म्हणून मा. मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरातील नागरिकामध्येपर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी नगरपरिषदमार्फत सायकलीचे आयोजन करण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुधरा 3.0 अभियानाच्या वायू या पटाका अंतर्गत पर्यावरण रक्षणा प्रदूषण कमी करणे, इंधनाची बचत याबाबत जनजागृती तसेच नागरिक त्यास प्रोत्साहन देण्यासाठी या भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात जाले होते.

 सदर रसीला शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला शहरातील विविध सामाजिक संघटना, नगरपलिका अधिकारी कर्मचारी व शहरातील नागरिक व सांमीला विद्यामंदीर प्रशालामधील शाळकरी मुले असे साधारण 250 सायकल प्रेमी यावेळी सहभागी झाले होते.

रॅलीची सुरुवात कार्यालयीन अधिक्षक श्री विजयकुमार कन्हेरे यांच्या हस्ते ध्वज फडकावून करण्यात आली. सदर लीची सुरवात सांगोला नगरपरिषद येथून महात्मा फुले चौक से भोपळे रोड, नाका, आबेडकर उद्यान, कोरी रोड मार्गे

 नगरपरिषद येथे रेलचे समारोप करण्यात आले यानंतर उपस्थिताना हरित शपथ देण्यात आली. सदर रेतीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सांगोला शहर समन्वयक सौ. तेजश्री बगाडे मॅडम श्री विनोद सर्वगोड स्वच्छता निरीक्षक, श्री प्रशाल बनसोडे सहाय्यक स्वच्छता

 निरीक्षक व विद्यामंदीर प्रशालेचे प्राचार्य भिमाशंकर पैलवान सर, श्री किरण घोंगडे सर, श्री. सुभाष निबाळकर सर श्री अश्वजीत माने यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी श्री जितेंद्र गायकवाड लेखापाल, श्री अमितजी कोर स्थापत्य अभियंता श्री. तुकाराम माने पाणी पुरवठा अभियंता 

श्री. योगेश गंगासहाय प्रकल्प अधिकारी, श्री कृष्णा मोरे – लायटर इतर अधिकारी द कर्मचारी उपस्थित होते. शेवटी अधिकारी, कर्मचारी, नागरीक, शालेय विद्यार्थी यांचे आभार स्वच्छता निरीक्षक श्री. विनोद सर्वगोड यांनी मानले.

नागरिकांनी पर्यावरण रक्षण, इंधन बचत व आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी सायकल चालविण्यावर भर दिला पाहिजे

Post a Comment

0 Comments