महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी
महाराष्ट्र सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सत्तानाट्याचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आता ही सुनावणी 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
मात्र 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबत कोणता निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे केस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. मात्र 16 आमदार जर अपात्र ठरवले गेले तर काय होईल यावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
सुप्रीम कोर्टाने जर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा असणार आहेत. एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर त्यांना मंत्री राहता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपद गेलं तर सरकार अस्तित्वात राहणार नाही. याचाच अर्थ असा होईल की कुणालाही बहुमत राहणार नाही आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल.
यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सरकार काम करतं आहे ते घटनाबाह्य होतं का? असा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे असे जे खटले आहेत ते सुप्रीम कोर्टाने लवकर निकाली काढले पाहिजेत. कारण सगळ्याच राज्यांमध्ये पक्षांतर सुरू आहे. निकोप लोकशाही जपायची असेल तर निर्णय लवकर घेतले गेले पाहिजेत असं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्ट केलं आहे.


0 Comments