राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, अखेर शिवशक्ती – भीमशक्ती एकत्र,
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या जयंती दिनी उध्दव ठाकरे व बाळासाहेब आंबेडकर यांची संयुक्त घोषणा
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी दादरमधील आंबेडकर भवन येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा केली असून गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय चर्चांना आज अखेर पूर्ण विराम मिळाला आहे.
हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी युतीची ही घोषणा महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अलिकडच्या काळातील सर्वात मोठी घटना मानली जात आहे. या युतीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असून अनेक समीकरणे बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
काही महिन्यांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले होते.
सुरुवातीला दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले. त्यानंतर शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकत्र येण्याची गरज बोलवून दाखवत, राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाची नांदी ठरणाऱ्या या ऐतिहासिक युतीची घोषणा करण्यात आली आहे.
0 Comments