सांगोला तालुक्यातील नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून मिळणार मोफत धान्य !
सांगोला प्रतिनिधी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण भारतात पात्र रेशनकार्ड धारकांना २०२३ या वर्षभरात मोफत धान्याचा पुरवठा होणार आहे.
या योजनेअंतर्गत सांगोला तालुक्यातील नागरिकांना मोफत धान्य दिले जाणार आहे.यापूर्वी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय कार्डधारकास प्रतिकार्ड १५ किलो गहू,२ रुपये किलो दराने, तर २० किलो तांदूळ ३ रुपये किलो दराने दिले जात होते.
अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती २ किलो गहू २ रुपये दराने, तर ३ किलो तांदूळ ३ रुपये किलो दराने दिले जात होते. जानेवारी २०२३ पासून अंत्योदय योजनेतील प्रत्येक कार्डधारकाला पूर्वीप्रमाणेच १५ किलो गहू व २० किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे.
तर अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती २ किलो गहू व ३ किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. सांगोला तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांकडून, या योजनेतील नागरिकांना योग्य पद्धतीने वाटप केले जाणार आहे.
या योजनेतील कर्डेधारकांनी रेशन धान्य दुकानदार यांना रेशनचे पैसे देऊ नयेत, तसेच कोणत्याही धान्य दुकानदार यांनी पैशाची मागणी केल्यास तात्काळ अन्नधान्य पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांना आवाहन !
सांगोला तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा२०१३ अंतर्गत सांगोला तालुक्यातील सर्व पात्र रेशनकार्ड धारकांना जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत संपूर्ण वर्षभर मोफत धान्य वाटप केले जाणार आहे.
कोरोना कालावधीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सुरु केलेले अतिरिक्त मोफत धान्य बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे सांगोला तालुक्यातील नागरिकांना प्रत्येक महिन्यात दोन वेळा मिळणारे धान्य एक वेळच मिळणार आहे. परंतु हे धान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुर्ण पणे मोफत दिले जाणार आहे.याची सर्व रेशनकार्ड धारकांनी नोंद घ्यावी.


0 Comments