पती बनला "हैवान"
अलीकडे किरकोळ कारणावरून वाद निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. किरकोळ कारणावरून टोकाची भूमिका घेण्याचे प्रमाण ही वाढत आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगरात पतीनेच धारदार हत्याराने वार करीत पत्नीची हत्या केली. शहर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दिपाली कानडे (वय 28 रा.यशवंत नगर ) असे मयत महिलेचे नाव आहे. आज तिचे आणि पती नागेश कानडे यांचे भांडण झाले. त्यातूनच नागेशने धारदार हत्याराने दिपालीवर वार केला. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही बाब लक्षात येताच नातेवाईक व परिसरातील नागरिक धावून आले.
दिर गणेश कानडे याने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी नागेश याला ताब्यात घेतले आहे.


0 Comments