google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर हेलिकॉप्टरने शरद पवार पोहोचले मंगळवेढ्यात कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाला..!

Breaking News

सोलापूर हेलिकॉप्टरने शरद पवार पोहोचले मंगळवेढ्यात कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाला..!

सोलापूर हेलिकॉप्टरने शरद पवार पोहोचले मंगळवेढ्यात कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाला..!

सोलापूर: शरद पवार हे नेमही आपल्या कार्यकर्त्यांना जपत असतात. याचा प्रत्यय सोलापुरातील एका लग्नात आला. एका कार्यकर्त्याने शरद पवार यांचे कार्यक्रम पाहून आपल्या मुलीचा लग्नमुहूर्त काढला होता. शरद पवार यांनी देखील या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत थेट हेलिकॉप्टरने सपत्नीक सोलापूर येतील मंगळवेढा येथे जात करकर्त्यांच्या मुलीच्या लग्नाला जात शुभशीर्वाद दिले.

मंगळवेढा तालुक्यातील येथील लतिफ तांबोळी यांच्या मुलीचा विवाह मरावडे येथे आयोजित करण्यात आला होता. लतिफ हे पहिल्यापासून पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. 

त्यांच्या मुलीचा विवाह असल्याने त्यांनी शरद पवार यांचे कार्यक्रम पाहून मुलीच्या लग्नाचा मुहूर्त काढला. तसेच पत्रिका देण्यासाठी ते शरद पवार यांना देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी पवार यांना पत्रिका देऊन लग्नात येण्याचा आग्रह केला. लतीफ यांनी रूढी परंपरा मोडत शनिवारी दुपारी ३ वाजता लग्नाची वेळ ठरवली.

दरम्यान, शरद पवार यांनी देखील लतीफ भाई यांच्या भावनांचा आदर ठेवत, ठरल्या वेळेला मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावात थेट हेलिकॉप्टरने उतरले. पवार यांनी चक्क विवाहाला सपत्नीक हजेरी लावल्याने लग्नासाठी आलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही धक्का बसला. 

एखादा कौटुंबिक कार्यक्रम असतील तरच पत्नी प्रतिभा ताई यांच्या सोबत शरद पवार दिसतात. मात्र मंगळवेढा तालुक्यातील एका साध्या कार्यकर्त्याच्या मुलीच्या विवाहासाठी हेलिकॉप्टर घेऊन सपत्नीक पवार आल्याने पवार यांची गाव पातळीवरील कार्यकर्त्यांशी आजही नाळ जोडली असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले.

Post a Comment

0 Comments