धक्कादायक घटना.. नायब तहसीलदार यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
सध्या राज्यात वाळू तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातूनच काही अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला जात आहे. अशीच एक बातमी बीड जिल्ह्यातून समोर येत आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्या संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आहेत. आज दुपारी त्या जेवण करून तहसील कार्यालयकडे जात होत्या. अशातच एका कारमधून आलेल्या चौघांनी त्यांच्यावर हल्ला केला.
त्यातच एका महिलेसह चौघांनी बॉटलमध्ये आणलेल्या पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत आशा वाघ सुदैवाने बचावल्या. दरम्यान आशा वाघ यांच्यावर सख्या भावानेच केल्याची घटना घडली होती. अलीकडे म्हणजेच जून महिन्यात ही घटना घडली होती. आज पुन्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.


0 Comments