google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! बेळगाव आम्हाला देऊन टाका आणि विषय संपवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट कर्नाटकच्या डॉक्टरांसमोर बेळगाव महाराष्ट्राला देण्याची मागणी

Breaking News

ब्रेकिंग! बेळगाव आम्हाला देऊन टाका आणि विषय संपवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट कर्नाटकच्या डॉक्टरांसमोर बेळगाव महाराष्ट्राला देण्याची मागणी

 ब्रेकिंग! बेळगाव आम्हाला देऊन टाका आणि विषय संपवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

यांनी थेट कर्नाटकच्या डॉक्टरांसमोर बेळगाव महाराष्ट्राला देण्याची मागणी

महाराष्ट्र आणि कर्नाटकात पेटलेल्या सीमावादावरून दोन्ही राज्यांचे सत्ताधारी एकमेकांसमोर आलेले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट कर्नाटकच्या डॉक्टरांसमोर बेळगाव महाराष्ट्राला देण्याची मागणी केली आहे.

 पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मूळ कर्नाटकचे असलेले रुग्णालयाचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे हे उपस्थित होते. त्यावेळी भाषणात दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवडमध्ये हॉस्पिटलचे उद्घाटनसोहळा पार पडल्यानंतर उपस्थितांशी बोलताना रुग्णालयाचे चेअरमन कोरे म्हणाले की,

 पवार मला नेहमी सांगत असतात की महाराष्ट्राला बेळगाव कधी देणार आहात?, त्यावेळी मी त्यांना नेहमी सांगत असतो की, घ्यायचे असेल तर संपूर्ण कर्नाटक घ्या पण बेळगाव नको, असं वक्तव्य कोरेंनी करताच सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. परंतु त्यानंतर भाषण करताना पवारांनी सीमावादाचाच धागा पकडत कोरेंची चांगलीच कोंडी केली. 

कर्नाटक असो की महाराष्ट्र, कोरेंनी काही नवीन केले की मला उद्घाटनाला बोलावतात. परंतु मी त्यांना काहीही मागत नाही. पण आता तेवढं बेळगाव महाराष्ट्राला देऊन टाका आणि विषय संपवा, अशी मिश्किल टिपण्णी पवारांनी केल्यानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्या वक्तव्याला दाद दिली.

Post a Comment

0 Comments