कर्जफेड नाही तर.. सावकाराची महिलेला धमकी : कर्ज फेडा अन्यथा वेश्या व्यवसाय करायला लावू.? सर्वत्र खळबळ.
कोल्हापुरात सावकाराच्या दादागिरीचा एक नवा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरच्या वडगणे गावातील एका कुटुंबाला गेल्या आठवड्या भरापासून सावकारांकडून दमदाटी आणि मारहाण होत असून कर्ज फेडा अन्यथा वेश्या व्यवसायाला लावू अशा प्रकारची धमकी सावकाराने एका पीडित कुटुंबाला दिली आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाकडून पोलिसात तक्रार करूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुटुंबाना केलेला आहे.
घर बांधण्यासाठी घेतलेल्या 25 लाख रुपयांच्या बदल्यात सावकाराने 85 लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे द्या, अन्यथा वेश्या व्यवसाय करायला भाग पडू, अशी धमकी दिली आहे.
त्या महिलेची कारसुद्धा या गुंडांनी ताब्यात घेतली असून घरही नावावर करून घेतलं आहे. घरातून बाहेर पडा, अन्यथा महागात पडेल अशा धमक्या दिल्या जात आहेत. दररोज येऊन आपलं प्रापंचिक साहित्य घराबाहेर टाकण्यात टाकले जात असल्याचे पीडित महिलेनं म्हटलं आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, दररोज तिच्या घरामध्ये 10 ते 12 गुंठांना पाठवलं जातं. धमकी दिली जाते. मात्र, पोलिसांकडे तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, असं त्या महिलेचे म्हणणं आहे.
या महिलेच्या घरी पुरुष आणि महिला गुंडसुद्धा जात असल्याने पीडित महिला त्रस्त झाली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गावच्या सरपंचांनीसुद्धा या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका न घेतल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सावकार कोल्हापूर शहरातील जवाहर नगर परिसरातील असून ही महिला कोल्हापूर शहराला लागून असलेल्या एका गावामधील आहे.
या महिलेला गेल्या अनेक दिवसांपासून सावकाराच्या गुंडांकडून त्रास दिला जात आहे. प्रापंचिक साहित्य रस्त्यावर टाकणे, घराबाहेर पडण्याची धमकी देणे, अशा प्रकारचा मानसिक त्रास या महिलेला दिला जात आहे. पोलिसांकडे दाद मागूनही कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नसल्याची भावना या संबंधित महिलेने व्यक्त केली आहे.
त्यामुळे या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातून बाहेर पडा, अन्यथा महागात पडेल अशा धमक्याही त्यांना या गुंडांकडून दिल्या जात आहेत. या गावगुंडांमुळे त्रस्त झालेल्या महिलेने आता न्यायाची मागणी केली आहे.


0 Comments