श्री छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
छत्रपती संभाजी महाराजांनी प्रखर बुद्धिमत्ता आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर आपली कारकीर्द तेजोमय बनवली . – मा . श्री . नागन्नाथ घोरपडे सर
शिरभावी :- सांगोला तालुक्यातील शिरभावी ( घोरपडे वस्ती ) येथील श्री छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये सोमवार दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या वेळी श्री छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नागन्नाथ घोरपडे सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पाहर अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी श्री छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नागन्नाथ घोरपडे सर यांनी माहिती देताना सांगितले की , छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ रोजी झाला .
या नंतर ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा हरवलेला आधार परत आणण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याभिषेक करून केले . राज्याभिषेक झाल्यानंतर खचलेल्या रयतेला आधार मिळाला .
छत्रपती झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहतील अशी जनतेला हमी दिली . राज्याभिषेकाप्रसंगी कैद्यांना मुक्त करण्याच्या रिवाजाप्रमाणे त्यांनीही कैद्यांना मुक्त करून मंत्रीमंडळात स्थान दिले व त्यांना कारभार सांगितला .
तसेच त्यांनी स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळत प्रखर बुद्धिमत्ता आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर त्यांनी आपली कारकीर्द तेजोमय बनवली . छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे पुढच पाऊल होत . असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष नागन्नाथ घोरपडे सर यांनी केले .
यावेळी या कार्यक्रमासाठी श्री छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नागन्नाथ घोरपडे सर , प्रमुख सल्लागार ॲड . संतोष घोरपडे , उपाध्यक्ष रामचंद्र घोरपडे , कार्याध्यक्ष पैगंबर मुलाणी ,
सचिव व छावा संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख नवनाथ घोरपडे , खजिनदार रामदास भातुंगडे , सहखजिनदार संतोष मोरे , डॉ . दिनेश रणदिवे , हणमंत मोरे , एकनाथ जगदाळे , शाहरुख मुजावर , आतिश होवाळ , योगेश सुरवसे , गणेश जाधव , सुरज मोरे , दत्तात्रय रणदिवे , अनिल रणदिवे , समाधान रणदिवे ,
चंद्रकांत घोरपडे , दत्तात्रय घोरपडे , विष्णु घोरपडे , रोहन घोरपडे , भारत मोरे , नारायण ढोले व इतर पदाधिकारी उपस्थित होते . या कार्यक्रमासाठी सचिव नवनाथ घोरपडे , उपाध्यक्ष रामचंद्र घोरपडे , खजिनदार रामदास भातुंगडे , सहखजिनदार संतोष मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले .


0 Comments