google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात विद्यार्थिनीचा ज्ञानमंदिरातच विनयभंग रंगेल मास्तरला बेड्या ! अल्पवयीन विद्यार्थिनीशी करीत होता लगट !

Breaking News

सांगोला तालुक्यात विद्यार्थिनीचा ज्ञानमंदिरातच विनयभंग रंगेल मास्तरला बेड्या ! अल्पवयीन विद्यार्थिनीशी करीत होता लगट !

सांगोला तालुक्यात विद्यार्थिनीचा ज्ञानमंदिरातच विनयभंग रंगेल मास्तरला बेड्या !

अल्पवयीन विद्यार्थिनीशी करीत होता लगट !

 गुरु शिष्याच्या पावित्र्याला कलंकीत करीत एका रंगेल शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीचा ज्ञानमंदिरातच विनयभंग केल्याची संतापजनक घटना पुन्हा एकदा समोर आली असून शिक्षकी पेशाला डाग लावणाऱ्या 'मास्तर' ला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत .

शिक्षणाच्या मंदिरात ज्ञानदानाचे पवित्र कार्य चालत असते आणि येथे गुरु शिष्याचे पवित्र नाते जपले जात असते. अशाच ठिकाणी स्वत:ला शिक्षक म्हणवणाऱ्या नराधम आणि रंगेल मास्तरने आपला आणखी एक वेगळा रंग दाखवत 

अल्पवयीन विद्यार्थिनीशी लगट करीत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एका शाळेत घडला आहे. शाळेतील फळ्यासारखा अंतर्बाह्य काळा असलेल्या शत्रुघ्न भांगरे नावाच्या नराधमाने नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनिशी लगट करण्याचा प्रकार केला आहे. 

शाळेचे स्नेहसंमेलन सुरु असताना या नालायक शिक्षकाने कार्यक्रम सुरु असताना एका मुलीला स्टेजच्या मागे असलेल्या एका वर्गात बोलावून घेतले. कवितेची वही देण्याचे निमित्त करून त्याने बोलावले आणि शिक्षकाने बोलावले म्हणून ही मुलगी देखील वर्ग खोलीत गेली.

 तेथे या नराधमाने या मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. सेल्फी काढू म्हणत तिला जवळ ओढून घेऊ लागला आणि सेल्फी काढली. यावेळी त्याने या मुलीला घट्ट मिठी मारली. दरम्यान हा प्रकार त्याच शाळेतील एका शिक्षकाने पाहिला आणि त्यामुळे नालायक शिक्षकाने या मुलीला सोडले.

त्यानंतरही या नालायकाने सदर मुलीला फोन करून या घटनेबाबत कोणाला काही सांगू नको, उलट ज्या शिक्षकाने हे पहिले होते तोच शिक्षक त्रास देतो असे आपण सांगू, आपल्या दोघांना बदनाम करण्यासाठी ते शिक्षक काहीही करतील' असे सांगितले. सदर मुलीने घडलेली घटना घरी आपल्या पालकांना सांगितली तेंव्हा पालकांनी शाळेला जाब  विचारला. 

एवढा धक्कादायक प्रकार घडला असतानाही तब्बल १८ दिवस हे प्रकरण अंधारात ठेवले गेले आणि अखेर मुख्याध्यापक रफिक मणेरी यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर सांगोला पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून नालायक शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

 सदर शिक्षकाचा इतिहास 'असाच' असून नाझरे येथेही त्याच्यावर काळा डाग लागलेला आहे. एवढी मोठी संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना घडूनही त्याच्यावर तक्रार देण्यासाठी १८ दिवस का लागले ? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. 

शाळेत नालायकपणा करणाऱ्या या 'मास्तर' ला वाचविण्याचा कुणी प्रयत्न करीत होते काय ? एवढा अपराध करूनही त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न नेमका कुणी केला हे देखील समोर येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

सदर मुलीच्या पालकांचा आणि गावकऱ्यांचा रोष वाढू लागल्यामुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले अन्यथा हा प्रकार दडपला गेला असता अशी चर्चाही सुरु झाली आहे. 

 या नालायक शिक्षकाला वाचविण्याचा प्रयत्न कुणी केला त्याचाही मुखवटा ओरबाडून काढण्याची गरज असल्याचा संताप व्यक्त होऊ लागला आहे. या घटनेबाबत देखील चौकशी केली जावी अशी मागणीही पुढे येताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments