सांगोला गुरुदत्त प्युअर व्हेज फॅमिली
रेस्टॉरंटमुळे विठ्ठल भक्तांची चांगली सोय होणार-आ.शहाजीबापू पाटील
सांगोला/प्रतिनिधी:बाबर कुटुंबियांनी सुरू केलेले गुरुदत्त प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हे हॉटेल चांगल्या रस्त्यावर आणि सुदंर इमारतीत सुरू झाले आहे.पुणे, मुंबई, बेंगलोर या शहरातील फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये असणार्या व्यवस्थेप्रमाणे याही ठिकाणी अत्याधुनिक पध्दतीने व्यवस्था करण्यात आली आहे.
शाकाहरी हे आता मानव जातीने स्वीकारलेला आहार असून पंढरपूर रोड वरील या हॉटेलमुळे विठ्ठल भक्तांची चांगली सोय होणार असल्याचा विश्वास आम.अॅड.शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
चि,प्रदिप विलास बाबर यांनी बिलेवाडी स्टॉप पंढरपूर रोड येथे नव्यानेच सुरु करत असलेल्या गुरुदत्त प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे भव्य उद्घाटन सोहळा सांगोला येथे गुरुवार दि.26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्यास आ.अॅड.शहाजीबापू पाटील, माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.दिपकआबा साळुंखे- पाटील, पुरोगामी प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, सां.ता.शि.प्र.मंडळ, सांगोलाचे अध्यक्ष प्रा.प्रबुध्दचंद्र झपके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
व्यासपीठावर आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, प्रा.प्रबुध्दचंद्र झपके सर, नवनाथ पवार, शहाजीराव नलवडे, बाळासाहेब बनसोडे, बाळासाहेब मस्के, सुभाष इंगवले, सोमेश यावलकर, किशोर बनसोडे, अॅड.बंडू काशीद, अरुण बिले, सतीशभाऊ सावंत, आनंदा माने, चेतनसिंह केदार-सावंत, राजेंद्र पाटील, अभिजीत नलवडे उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.शहाजीबापू पाटील म्हणाले, येणार्या 2 वर्षात सध्याच्या सांगोला शहरापेक्षा चांगले शहर असेल. सांगोला सुदंर शहर करणार असून मोठ मोठे उद्योग धंदे या ठिकाणी आणणार आहोत.
येणार्या तीन वर्षाच्या कालावधीत सांगोला शहराचा चेहरामोहरा बदलणार असून सांगोल्याचे वेगळे रूप दिसेल असे सांगत शहर व तालुक्यातील तरुणाचे हजारो व्यवसाय सुरू झाले पाहिजे त्याचप्रमाणे आर्थिक भरभराटी झाली पाहिजे अशी अपेक्षाव्ये करुन बाबर कुटुंबियांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, गुरुदत्त प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमुळे सांगोला तालुक्यात नवीन पध्दतीची भर पडली आहे याचे मनाला खूप मोठे समाधान मिळाले आहे. बाबर कुटुंबियांनी अद्ययावत हॉटेल उभे केले असून जागेचा चांगला उपयोग केला आहे. या व्यवसायावर अनेक कुटूंबांचा उदरनिर्वाह होणार आहे. या हॉटेल व्यवसायात नम्रता, स्वच्छता, उत्तम सेवासुविधा पुरावाव्यात असे सांगून
बाबर बंधूचा इतर तरुणांनी आदर्श घेवून इतर चांगल्या उद्योग व्यवसायाला सुरुवात करावी असे सांगत बाबर कुटुंबियांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा.प्रबुध्दचंद्र झपके यांनी बाबर कुटुंबियांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत व्हेज जेवणाचे फायदे अधिक आहेत . त्यामुळे गुरुदत्त प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हे हॉटेल येणार्या काळात सवारच्या कौतुकास पात्र ठरेल असा विश्वास व्ये केला. सवारचे स्वागत चि.प्रदिप विलास बाबर,.विलास पांडुरंग बाबर,
दिनेश विलास बाबर,अंबिका विलास बाबर, अर्चना दिनेश बाबर, विजया बाळासाहेब बाबर व चि.सिध्दनाथ बाळासाहेब बाबर यांनी केले. यावेळी पत्रकार रवि कांबळे, अमेय मस्के, बापू भाकरे, अमोल महारनवर, मनोज गावडे, धनाजी निकम, सुभाष देशमुख, पांडुरंग बिले, अशोक देशमुख, अरुण देशमुख,
शिवाजी देशमुख,शैलेंद्र पाटील, तात्यासाहेब बाबर, माजी नगरसेवक अरूण काळे, दिपक बनसोडे, सदाशिव देशमुख, पांडुरंग देशमुख, अमित देशमुख, दिलीप माने-देशमुख,अंबादास गायकवाड, अजित पाटील, पतंग काटकर, नितीन देशमुख, विनायक बिले, बापू गायकवाड, सागर माने-देशमुख, गणेश बाबर,
मारुती चव्हाण यांच्यासह शिवरत्न ग्रुप बिलेवाडी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी यांच्यासह बाबर कुटुंबियांवर प्रेम करणारे बिलेवाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्तात्रय देशमुख यांनी मानले.
आज कै.बाळासाहेब पांडुरंग बाबर यांची आठवण झाली आहे. आज हे पाहण्यासाठी ते पाहिजे होते. त्याच्या स्मृती जगविण्यासाठी बाबर कुटुंबीय चांगले पध्दतीने हॉटेल चालवून सर्वांपुढे एक आदर्श निर्माण करतील अशी अपेक्षा आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली.



0 Comments