google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जमिनीच्या वादातून निष्पाप युवतीचा गेला बळी

Breaking News

जमिनीच्या वादातून निष्पाप युवतीचा गेला बळी

 जमिनीच्या वादातून निष्पाप युवतीचा गेला बळी

गावातील जमीन जुमल्याचे, भावकीतील वादात २२ वर्षीय तरुणीचा बळी गेला. ही घटना राजापूर तालुक्यातील भालवली येथे बुधवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.यातील हल्लेखोराला नाटे सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील हल्ला झालेली दुसरी तरुणीला जिल्रुहा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सिध्दि संजय गुरव (वय 22) आणि साक्षी मुकूंद गुरव (वय २१ ) या दोघी भालवली वरची गुरव वाडी येथील रहिवासी असून भालावली सिनियर काॅलेज धारतळे येथे शिकत होत्या.

 महाविद्यालय सुटल्यानंतर ११ वाजता नेहमीप्रमाणे दोघी नेहमीच्याच पण आडवाटेने घरी निघाल्या होत्या. याच वाटेवर विनायक शंकर गुरव (५५, रा. वरची गुरववाडी) हा दबा धरून बसला होता.

 त्याने समोरून सिद्धीला येताना पाहिले आणि तिच्यावर दांडक्याने हल्ला केला. यात घाबरून गेलेल्या सिद्धीला वाचवण्यासाठी साक्षी पुढे आली. साक्षी मध्ये आल्यानंतर विनायकने आपला मोर्चा साक्षीकडे वळवला आणि तिच्यावर दांडक्याने हल्ला केला. तिचा गळा आवळला.

याच दरम्यान सिद्धीने तिथूनच मोबाईलवरून घरी संपर्क केला आणि झालेली घटना सांगितली. तोपर्यंत विनायक तिथून पळून गेला होता. हल्ल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी नाटे पोलिसांनी माहिती दिली आणि घटना स्थळी धाव घेतली.

 हा हल्ल्यात साक्षी जागीच गतप्राण झाली होती. तर सिधी गंभीर जखमी झाली होती. तिला तत्काळ धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तोथून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रत्नागिरी येथे हलवण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत.

Post a Comment

0 Comments