स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढली राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिकांमधील स्वीकृत म्हणजेच नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नगरविकास विभागाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आला आहे.
आगामी काळात राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, मालेगाव अशा तब्बल २४ महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. इचलकरंजी महापालिका निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची पहिलीच निवडणूक पार पडणार आहे.
अधिकाअधिक कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टीनं महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. महापालिका निवडणुकीत जे उमेदवार पराभूत होतील किंवा ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळत नाही, त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाते.


0 Comments